शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतूकदारांनी अडविला सहा तास रस्ता

By admin | Updated: July 14, 2016 00:36 IST

तामसवाडी रेती घाटावरून उपसा करण्यात आलेल्या रेतीची सितेपार गावातून वाहतूक केली जात आहे.

सीतापुरात वाहतूक ठप्प : ओव्हरलोडेड रेती वाहतुकीने रस्त्याची दूरवस्था चुल्हाड (सिहोरा) : तामसवाडी रेती घाटावरून उपसा करण्यात आलेल्या रेतीची सितेपार गावातून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे पडले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी बुधवारला सकाळी ६ वाजता मुख्य रस्त्यावर लाकडांचे ओंडके टाकून रेतीचे ट्रॅक्टर व ट्रकांना ६ तास रोखून धरले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. सिहोरा परिसरात ३ रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. यात वैनगंगा नदी काठावरील तामसवाडी रेती घाटांचा समावेश आहे. या घाटावरून उपसा करण्यात आलेली रेतीची वाहतूक सितेपार गावातून केली जात आहे. ओव्हरलोड रेतीची वाहतूक ट्रकमधून होत असल्याने प्रमुख रस्ता खड्डेमय झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. परंतु सितेपार - तामसवाडी - डोंगरला हा प्रमुख मार्ग दुरुस्त करण्यात आला नाही. रेतीघाटांचे कंत्राटदार रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. सितेपारचे सरपंच गजानन लांजेवार यांनी २० वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे. परंतु रस्त्याची अवस्था वाईट असताना दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सितेपार गावातच बुधवारला सकाळी सहापासून ट्रॅक्टर व ट्रकची अडविण्यसााठी सुरुवात केली. प्रमुख मार्गावर लाकडांचे ओंडके टाकण्यात आले. यामुळे ट्रक व ट्रॅक्टरच्या लांबचलांब रांगा तयार झाल्या. यावेळी गावातील प्रमुख चौकात जिल्हा परिषद सदस्य रेखा ठाकरे, सरपंच गजानन लांजेवार, देवचंद ठाकरे व मोहगावचे उपसरपंच उमेश कटरे यांचे नेतृत्वात गावकऱ्यांनी ठिय्या मांडला. खड्डेमय असणाऱ्या मार्गाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी गावकरी व पदाधिकारी अडले. तब्बल सहा तास रेतीचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक गावकऱ्यांनी रोखून धरले. घटना स्थळावर नायब तहसीलदार निलेश गोंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र शेंटे व कंत्राटदार उपस्थित झाले. कंत्राटदारांनी रस्ता डागडुजीची जबाबदारी स्वीकारल्याने वाहने सोडण्यात आली. यावेळी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. (वार्ताहर)