शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीने रस्त्यांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:40 IST

रेती वाहतुकीतील अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. रेतीघाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असून महसूल आणि परिवहन विभाग मात्र अशा वाहन धारकांवर कोणतीही कारवाही करताना दिसत नाही.

ठळक मुद्देबांधकाम विभागाला भुर्दंड : लिलावापूर्वीच सुरू आहे घाटांमध्ये खनन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेती वाहतुकीतील अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. रेतीघाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असून महसूल आणि परिवहन विभाग मात्र अशा वाहन धारकांवर कोणतीही कारवाही करताना दिसत नाही.भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदीपात्रासह चुलबंद, सुर नदी, बावनथडी आणि नाल्यांमधून रेतीचे मोठ्या प्रमाणात खनन केले जात आहे. पवनी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून वाहणाऱ्या वैनगंगेच्या पात्रातून रेतीचे उत्खनन अहोरात्र सुरु आहे. जेसीबी मशीनद्वारे उत्खनन करुन ट्रक व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. बहुतांश वाहने क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेतात. राज्य व जिल्हा मार्गावरुन रेतीची वाहने धावत असल्याने रस्त्याची दुदर्शा झाली आहे. अनेक रेतीघाटालगतचे रस्ते या वाहनांमुळे उखडले आहेत. महसूल विभागाला यातून महसूल मिळत असला तरी त्याचा भुर्दंड मात्र बांधकाम विभागाला सोसावा लागत आहे.रस्त्यांवर पडलेल्या या खड््यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकदा बांधकाम विभाग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करतात. मात्र अहोरात्र सुरु असलेल्या या वाहतुकीने पुन्हा खड्डे जैसे थे होतात. याचा त्रास या मार्गावरुन जाणाºया वाहनधारकांसह गावकऱ्यांनाही सहन करावा लागतो. विशेष म्हणजे अवजड वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार परिवहन विभागाला आहे. परंतू रेती वाहतुकीच्या संदर्भात कारवाई करताना केवळ पोलीस व महसूल विभागच दिसतो. परिवहन विभाग अशा वाहनांवर कारवाई करीत नाही. त्यांना दंड आकारत नाही. त्यामुळे अशा वाहन चालकांचे मनोबल वाढले आहे. यंदा तर अद्यापही जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे महसुल विभागालाही महसुल प्राप्त नाही. परंतु रस्त्याची दुदर्शा मात्र होत आहे.रेतीचा परवाना काढताना त्यावरच किती ब्रास रेती वाहुन न्यायची आहे, हे ठरलेली असते. परंतु अधिक पैसे कमविण्याच्या नादात रेती तस्कर रस्त्यांची वाट लावत आहेत.