शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: January 27, 2015 23:28 IST

सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी अंतर्गत असलेल्या खडकी पालोरा ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी मंजूर झाले. मात्र कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

युवराज गोमासे - करडी पालोरासार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी अंतर्गत असलेल्या खडकी पालोरा ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी मंजूर झाले. मात्र कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची पार एैसीतैसी झाली आहे. रस्त्यावर दोन मोठे अपघात झाले. १५ दिवसापूर्वी खडकी येथील एका मुलीचा अपघातात मृत्यू झाला. परंतु विभाग जाणे व्हायला तयार नाही. आणखी बळी हवे आहेत काय? विभाग आणि ठेकेदाराला असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.खडकी ते पालोरा ३ कि.मी. अंतरामध्ये मोजून ३५० खड्डे पडले आहेत. रस्ता आहे की मृत्यूचा द्वार हे समजण्याअगोदर वाहन चालक खड्ड्यात कोसळतो. विभागाला मात्र काहीही देणे घेणे वाटत नाही. शासनाने सदर कामाला दोन महिन्यापूर्वीच मंजूरी दिली आहे. पॅचेसचे काम मंजूर करून ६ लाखाचा निधीही दिला आहे. संबंधित ठेकेदाराला कामाचे कंत्राट झाले असताना बांधकामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. ठिकठिकाणी रस्ता उखडला असून गिट्टी सर्वदूर पसरली आहे. खोल खड्डे, आडव्या नाल्या रस्त्यावर पडल्याने वाहन चालक रस्त्यावरून वाहने न चालविता काठाने चालवित आहेत. काही खड्यांजवळ चार ते पाच ठिकाणी गिट्टी टाकली गेली असून संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आला आहे. वाहने चालविणे फार धोक्याचे काम होऊन बसले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. वाहने वारंवार बिघडत असून पंक्चर होणे, इंधनाची नासाडी होणे, प्रवाशांच्या वेदना होणे नेहमीच बाब होऊन बसली आहे. सर्वच राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असून सत्ता पक्षाचे लोक शब्द काढायला तयार नाहीत. सत्ताधारी पक्षांनी साधलेली चुप्पी दु:खदायक आहेत. कसे येणार अच्छे दिन? कुठे आहेत नागरिकांसाठी अच्छे दिन? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जबाबदारी स्वीकारण्यास लोकप्रतिनिधी घाबरत आहेत. आतापर्यंत इतरांना दोष देणारे, मोठमोठी भाषणे ठोकणारे या विषयावर बोलत नाहीत, ही शोकांतिका आहे. या रस्त्यावर दोनदा मोठे अपघात घडले. १५ दिवसापूर्वी घरासमोर खडकी येथील मुलीचा खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकाकडून हकनाक जीव गेला. ठेकेदाराची मनमानी हा चिंतेचा विषय असला तरी सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा जवळचा व तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी असल्याने अधिकारी कंत्राटदाराचा मनमानी कारभार खपवून घेत आहेत. रस्ता मात्र नागरिकांना हैराण करीत आहे.