शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

समृद्धीनगरातील रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: June 28, 2014 01:01 IST

शहरातील प्रभाग क्र. ५ अंतर्गत येणारा तकीया वॉर्ड, हनुमान नगर ते समृद्धीनगर, म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे.

भंडारा : शहरातील प्रभाग क्र. ५ अंतर्गत येणारा तकीया वॉर्ड, हनुमान नगर ते समृद्धीनगर, म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. १९९४-९५ नंतर कोणत्याही प्रकारचे रस्ता दुरुस्तीचे काम झालेले नाही. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. रात्रीचे वेळी पायी चालणे कठीण झालेले आहे. पटेल सॉ मिल ते हनुमान नगरपर्यंत पथदिवे बंद राहतात. नेहमी अंधार असतो. त्यामुळे वॉर्डातील रात्रीला या रस्त्याने घातपाताची शक्यता आहे. एखाद्यावेळी समाजकंटक, गुंड प्रवृत्तीचे लोकांकडून सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. वॉर्डात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत प्रभाग क्र. ५ मधील नगर सेवक यांचेशी भेटून त्यांना रस्त्याची दुर्दशा बाबत अवगत केले. मात्र त्याचा फायदा काहीही झालेला नाही. जिल्हा परिषद अंतर्गत दिवाण सभागृहाच्या मागे पूर्णत: उखडलेला आहे. सध्या पावसाळा सुरु झाला असून दोन्ही रस्ते वेळेत दुरुस्त न केल्यास अपघात होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता आहे.सन १९९५ नंतर अस्तित्वात आलेले भंडारा शहरातील इतर कॉलोनीमधील रस्त्यांचे बांधकाम पक्के होवून प्रभाग क्र. ५ मधील रस्ते दुरुस्ती करण्यात आलेले नाही. यापूर्वी माजी अवजड केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी वॉर्डात सभा घेऊन सभेत कॉलनीतील रस्ते बनविण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतु रस्त्याचे काम झालेले नाही. सदर कॉलनीला भेट देवून रस्त्याची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभाग कय. ५ मधील नागरिकांनी केली आहे. दि. १ जुलैपर्यंत मागण्यांवर काहीही तोडगा न निघाल्यास नाईलाजास्तव कोणतीही पूर्व सूचना न देता कधीही कॉलोनीवासीयांना मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येईल. आगामी विधानसभा निवडणुकीवर, घर टॅक्स, नळाच्या बिलावर बहिष्कार टाकणे बाबत निर्णय घ्यावे लागेल. यामुळे होणारे परिणामास शासन, प्रशासन जबाबदार राहील. असा गंभीर इशारा प्रभागातील नागरिकांनी संबंधितांनाा दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात चेतन चेटुले, पिंटू तिजारे, सतीष हजारे, कमलेश बाभरे, आशिष खंडाते, तुषार बांते, नितीन झलकरिया, निलेश बाभरे, प्रशांत कुकडे, मुलचंद खराबे, नरेंद्र रामटेके, टेंभुर्णे, रामटेके, उरकुडे, कावळे, मुन्ना तिवारी, फेंडर, विश्वनाथ हलमारे, सुखदेव सार्वे, दादाराम निंबार्ते, सुरेश रेहपाडे, घनश्याम गोमासे, खंडाते, हेडाऊ, जगदिश हजारे, घुमरे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)