भंडारा : जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची सभा जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा डॉ.माधवी खोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नागपूर नाका ते पथकार नाका या राष्ट्रीय महामार्गास जोडणाऱ्या सर्व छोट्या मार्गावर स्पीड ब्रेकर बनविण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाला जे रस्ते शहरातून जोडले जातात त्या रस्त्यांचे निरीक्षण पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी करून याबाबतचा अहवाल संकलीत करून पुढील कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सादर करावे, असे निर्देश देण्यात आले.शहरात जोड रस्त्याच्या ठिकाणापासून २०० मिटर अंतराचे आत वाहन थांबे नसावेत या पद्धतीने बस थांबे निश्चित करावे. आॅटोरिक्षा, टॅक्सी, दुचाकी व इतर वाहनांकरिता पार्कींग थांबे निश्चित करण्याचे दृष्टीने शहरात पार्कींगच्या जागेचे नकाशे तपासून व जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा असे नर्देश नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेत. तसेच पे आणि पार्क योजनेकरिता खाजगी जागा मालकांनी भेट घेवून अशा खासगी जागा भाडे तत्वावर उपलब्ध होवू शकतात किंवा कसे याबाबतचा अहवाल सुद्धा सादर करावा असे नर्देश देण्यात आले. वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने ज्या मार्गावर अतिक्रमण झाले आहे अशा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे. या कामाकरिता नगरपालिकेने कायमस्वरुपी अतिक्रमण हटाव पथक कार्यान्वित करावे. याकरिता पोलीस विभागाने आवश्यकतेनुसार बंदोबस्त पुरवावा असे निर्देश देण्यात आले.राज्य महामार्गू व जिल्हा महामार्गावर संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मार्गावर साईन बोर्ड लावण्याची कारवाई त्वरीत करावी.ज्या शाळा महामार्गालगत असून अशा शाळाजवळ माहितीपर बोर्डस् लावण्यात आलेले नाही अशा स्थळांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी संकलीत करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद चौकातील वाहतूक सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्याबाबत संयुक्त कारवाई पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा व मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा यांना सादर करावी. तसेच राजीव गांधी चौक, लाल बहादूर शास्त्री चौक, कुकडे नर्सिंग होम जवळील चौक, खांब तलाव चौक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक येथे वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे दृष्टीने वाहतूक नियंत्रण शाखा यांनी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले.शहरात वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने विना परवानगी लावण्यात आलेले होर्डिंे ज्यांच्या अधिनस्त जागेवर, कार्यक्षेत्रात आहेत अशा संबंधित विभागाने यंत्रणांनी असे विना परवानगी लावण्यात आलेले होर्डिंग काढून टाकावेत असेही यावेळी ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)
महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला गतीरोधक होणार
By admin | Updated: August 20, 2014 23:22 IST