शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावरील रेल्वे फाटक बंदने अर्धा तास वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:20 IST

दक्षिण पूर्ण रेल्वेची ५३२ क्रमांकाची फाटक रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत बंद होती. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या सुमारे एक ते दीड कि.मी. रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यानंतर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती.

ठळक मुद्देवाहनांच्या रांगा : उड्डाणपूल ठरत आहे डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दक्षिण पूर्ण रेल्वेची ५३२ क्रमांकाची फाटक रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत बंद होती. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या सुमारे एक ते दीड कि.मी. रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यानंतर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. उड्डानपूल बांधकामामुळे केवळ एकच पोचमार्ग सुरु असल्याने एकाच मार्गावरुन वाहनांची ये-जा सुरु आहे. लहान मुले, महिला व वृध्द पुरुषांना फाटक बंदचा मोठा फटका बसला.तुमसर-गोंदिया राज्य मार्ग मोठा वर्दळीचा आहे. चार वर्षापूर्वी येथे उड्डान पुलाचे काम सुरु करण्यात आले. कासवगतीने सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. दर सात मिनिटाला येथे रेल्वे फाटक बंद होते. २४ तासात १८० ते २०० रेल्वे गाडया येथून जातात. फाटक बंद १० ते १५ मिनिटे राहते. रविवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे फाटक बंद १० ते १५ मिनिटे राहते. रविवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे फाटक बंद करण्यात आली. सुमारे अर्धा तास फाटक बंद होती. दोन मालगाडया कासवगतीने येथून रवाना झाल्या. रविवारी देव्हाडी येथे आठवडी बाजार असतो. सध्या दिवाळी निमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.एक ते दीड कि.मी. वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. कासवगतीने वाहनधारकांनी वाहने काढली. यथे ट्रॅफिक संचालन करणारे कुणीच राहत नाही. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी होण्यास विलंब लागतो. गोंदिया मार्गावरील एकच पोचमार्ग सुरु आहे. तुमसरकडे जाणाराही एकच पोचमार्ग सुरु आहे. त्यामुळे अरुंद पोचमार्गावरुन दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरु असल्याने वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरून धुळीचा दुसरा मोठा त्रास येथे सुरुच आहे. पोचमार्गावर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहेत.आॅटो सिग्नल प्रणालीमुळे स्वयंचलीत रित्या रेल्वे फाटक बंद व सुरु होते. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक मोठया प्रमाणात वाढली आहे. रेल्वेने अद्याप उड्डाणपूलाचे (गडर) कामे सुरु केली नाहीत. त्यामुळे उड्डाणपूलांची कामे केव्हा पूर्णत्वास येथील असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. केंद्र व राज्य शासनाने येथे उड्डाणपूलाकरीता निधी दिला आहे. हे विशेष.