शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांना पुनरुज्जीवित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:31 IST

सिंचनाची सोय करणाऱ्या प्रकल्पांना सौर उर्जेची जोड देण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे थकीत विज देयकाने भंगारात निघालेल्या सिहोरा परिसरातील दोन प्रकल्पांना संजिवनी....

ठळक मुद्देबपेरा, पिपरी चुन्हीचे प्रकल्प भंगारात : बारमाही सिंचनाची सोय होणार

ऑनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : सिंचनाची सोय करणाऱ्या प्रकल्पांना सौर उर्जेची जोड देण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे थकीत विज देयकाने भंगारात निघालेल्या सिहोरा परिसरातील दोन प्रकल्पांना संजिवनी व पुनरुज्जीवित करण्याची ओरड सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे अनेक हेक्टर शेती बारमाही ओलिताखाली येणार आहे.बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना मंजूर होण्यापूर्वी सिहोरा परिसरात असणाºया वैनगंगा नदीवर शेतकºयांनी स्वत:च सिचंनाची सोय करण्यासाठी प्रकल्प उभारले आहे. गाव व शेजारी गावाचे हद्दीत अंदाजे ६०० हेक्टर आर शेती ओलिताखाली आणण्याचे कार्य या बंद असणाºया प्रकल्पांनी केले आहे. बारमाही १२०० हेक्टर आरहून अधिक शेती सिंचित करण्याची क्षमता दोन प्रकल्पात आहे. बपेरा आणि पिपरी चुन्ही गावात स्वत: प्रकल्पाचे नहर असणारी ही प्रकल्प दिमाखात उभी आहे. प्रकल्पस्थळात वाढते विजेचे देयक आणि धान पिकाचे नुकसान यामुळे पाणीपट्टी कराचे देयक शेतकºयांनी केले नाही.याशिवाय निधीअभावी पंपगृहांची दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे प्रकल्प बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला. गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पाची वास्तू उभी असताना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले नाही. याच काळात वैनगंगा नदी पात्रात उन्हाळ्यात पाण्याची समस्या होती. परंतु आता नदी पात्रात बारमाही पाणी राहत आहे. या प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आर्थिक मदतीची जोड देण्याची गरज आहे. बारमाही सिंचनाची सोय करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना असली तरी या योजनेने १४ हजार हेक्टर आर शेतीला बारमाही कधी ओलीताखाली आणले नाही. यामुळे वैनगंगा नदी काठावर असणारे बपेरा आणि पिपरी चुन्ही गावातील दोन्ही प्रकल्प शेतकºयांना 'सोने पे सुहागा' ठरणारी आहेत. दरम्यान शासनाने प्रकल्पांना सौर उर्जेवर आणण्याचे प्रयत्न सुरू केली आहेत. यामुळे शेतकºयांना स्वस्त दरात पाणी सिंचनासाठी मिळणार असले तरी, उन्हाळ्यात सोंड्याटोला प्रकल्प नदी पात्रातून पाण्याचा उपसा करू शकत नाही. यामुळे बारमाहीचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार असल्याने बपेरा व पिपरी चुन्हीचे बंद असणारे प्रकल्प सुरू करण्याची ओरड आहे.बपेरा आणि पिपरी चुन्हीत बंद असणाºया प्रकल्पांना नव्याने पुनरुज्जीवित केल्यास शेतकºयांना बारमाही सिंचनाची सोय होणार आहे. राज्य शासनाने लक्ष केंद्रीत करण्यासाठी शेतकºयांचे स्वाक्षरीनिशी पत्र पाठविणार आहे.-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ, सिंदपुरी.