शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी घेतला कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 21:29 IST

उपतालुक्याचा दर्जा असणाऱ्या सिहोरा गावात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी भेट देऊन विविध विभागाची तथा कामांची पाहणी केली. याशिवाय शाळा आणि अंगणवाडीचे विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. विविध विकास कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देसिहोरा गावाला भेट : शाळेत विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उपतालुक्याचा दर्जा असणाऱ्या सिहोरा गावात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी भेट देऊन विविध विभागाची तथा कामांची पाहणी केली. याशिवाय शाळा आणि अंगणवाडीचे विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. विविध विकास कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.सिहोरा गावात असणाºया जिल्हा परिषद हायस्कूलने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. एरवी या शाळेत विद्यार्थ्यांचा वनवा असताना या संख्येत वाढ झाली आहे. विद्यार्थी संख्येने तीन अंकी आकडा गाठला आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांचे प्रयत्नाने या शाळेत विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यात गावकरी, शिक्षण समिती आणि प्राचार्य ओ.बी. गायधने यांचा सिहांचा वाटा आहे. शाळा बंद होण्याचे मार्गावर असताना पुन्हा शाळेने सकारात्मक प्रयत्नाने प्रगतीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली आहे. या शाळेची यशोगाथा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे. या हायसकूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र जगताप यांनी भेट देवून पाहणी केली.विद्यार्थी आणि शिक्षकासोबत संवाद साधला. याच हायस्कूलचे लगत नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम करण्यात येत असल्याने इमारतीची पाहणी ज्यांनी केली. गावात असणाºया अंगणवाडी इमारतींना भेट देवून स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि बालकांची प्रगती या विषयी त्यांनी माहिती जाणून घेतली.बालकांसोबत त्यांनी संवाद साधत अंगणवाडी सेविकांना काही सुचना दिल्या. याच गावात असणाºया पशु वैद्यकीय दवाखान्याची पाहणी त्यांनी केली. ग्रामपंचायत अंतर्गत गावात अनेक विकास कार्य करण्यात येत आहे. या कामाची स्थिती त्यांनी जाणून घेतली आहे. गावात लोकोपयोगी करण्यात येणारी कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सिहोरा गावात विविध विभाग आणि कार्यालयाचे भेट त्यांनी घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर, तुमसर पंचायत समितीचे बिडीओ मोहोड, सहायक बिडीओ मिलिंद बडगे, विस्तार अधिकारी ठवरे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, प्राचार्य ओ.बी. गायधने, सरपंच मधु अडमाचे तथा अन्य कर्मचारी उपस्थित होते.