शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

महसूल मंडळनिहाय पिकांचे फेर सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात धानपिक उध्वस्त झाला. शेतकरी देशोधडीला लागले. मात्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात धानपिक उध्वस्त झाला. शेतकरी देशोधडीला लागले. मात्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड रोश निर्माण झाला आहे. आता महसूल मंडळनिहाय पीक पाहणी करून फेरसर्व्हेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाश्वभूमीवर शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बावनकुळे यांनी लोकप्रतीनिधीवर प्रशासकीय अधिकाऱ्याशी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय फेरसर्व्हेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.या बैठकीला आमदार चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशीवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, महसूल उपजिल्हाधिकारी सुहास चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सर्व आमदारांनी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आग्रही मागणी लावून धरली. दुष्काळातून सुटलेल्या तालुक्यांसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीसमोर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.नुकसानग्रस्त व गरजु एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. नुकसानग्रस्त महसूल मंडळात ग्रामपंचायतीमध्ये पीक पाहणीचा अंदाज घेण्यासाठी पीक कापणीचे अतिरिक्त चार प्रयोग करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिली.दुष्काळात सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जास्तीत जास्त शेतकºयांना मदत मिळेल याची काळजी घ्यावी. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पालकमंत्री म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळून देण्यात येईल. अजुनही वेळ गेली नाही. शेतकºयांनी काळजी करू नये, असे आश्वासन त्यांनी दिले.पीक कापणी प्रयोगाला पालकमंत्री उपस्थित राहणारजिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निश्चितच मदत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले ज्या महसूल मंडळात अधिक नुकसान झाले, अशा सर्व मंडळातील गावात पीक कापणीचे अतिरिक्त प्रयोग घेवून फेर सर्व्हेक्षण करण्यात यावा. यावेळी आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोबत घ्यावे. त्यांच्या सहमतीने अहवाल तयार करावा, पीक कापणी प्रयोगाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.