शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पवनी तालुक्यात राजस्व अभियान ठरले नावापुरते

By admin | Updated: August 16, 2014 23:18 IST

पवनी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे दोन महिन्यापासून महसूल अधिकाऱ्यांची सही न झाल्याने भंडारा येथे पडून आहेत. तसेच वर्ग दोनचे प्रकरण अनेक महिन्यापासून निकाली न निघाल्याने

पवनी : पवनी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे दोन महिन्यापासून महसूल अधिकाऱ्यांची सही न झाल्याने भंडारा येथे पडून आहेत. तसेच वर्ग दोनचे प्रकरण अनेक महिन्यापासून निकाली न निघाल्याने सुवर्ण जयंती राजस्व अभियानाबद्दल पवनी तालुक्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आले. यामध्ये शाळा महाविद्यालयात प्रमाणपत्रे वाटप, फेरफार, वर्ग २ चे वर्ग १ प्रकरण निकाली काढणे असे अनेक कार्यक्रम आहेत. पण सध्या पवनी तालुक्यातील शेकडो वर्ग २ चे वर्ग १ साठी प्रकरण भंडारा येथे पडून आहेत. तसेच जातीचे, नॉन क्रिमिलीयर, अधिवास असे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी पवनी तहसील कार्यालयामध्ये प्रमाणपत्र बनविण्यासाठी दिले आहेत. ते प्रकरण भंडारा येथे पाठविण्यात आले आहेत. पण त्या प्रमाणपत्रावर दोन महिन्यापासून सह्या झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतात. वर्ग दोनचे प्रकरण वर्ग १ करण्यासाठी शेतकऱ्यांनी बंदोबस्त मिसल, हिस्सा फार्म, नवीन जुना सातबारा असे सर्व कागदपत्रे देऊन अनेक प्रकरणे तहसील कार्यालय पवनी येथे तलाठ्यामार्फत दिली. पण वर्ग दोनचे वर्ग एक प्रकरण अनेक महिन्यापासून मंजूर झाले नाही. राजस्व अभियानात देखील शेतकऱ्यांनी अनेक वर्ग १ चे प्रकरण तलाठ्याकडे दिली पण ती अजूनपर्यंत निकाली निघाले नाही. राजस्व अभियान महसूल प्रशासन गतीमान सुलभ व लोकाभिमुख होण्यासाठी की लोकांना त्रास देण्यासाठी आहे असा प्रश्न अनेक शेतकरी विचारीत आहेत. फेरफार प्रकरणे देखील लवकर निकाली लागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरी महसूल विभागाने गतीमान, सुलभ होण्यासाठी प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याची मागणी जनतेने केली आहे. (प्रतिनिधी)