शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अपंग कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करा

By admin | Updated: May 27, 2016 00:56 IST

केंद्र शासन व राज्य शासनाकडून अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना विविध सूट व सवलती देण्यात येतात.

जिल्ह्यात अनेक बोगस अपंग कर्मचारी : काशिनाथ ढोमणे यांची मागणीभंडारा : केंद्र शासन व राज्य शासनाकडून अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना विविध सूट व सवलती देण्यात येतात. मात्र याचा लाभ खऱ्या अपंग कर्मचाऱ्यांना मिळण्यापेक्षा बोगस अपंगांना मिळत आहे. कुठल्याही प्रकारचे अपंगत्व नसताना अनेक कर्मचारी बोगस अपंगत्वाचे सर्टिफिकेट मिळवून त्या आधारे अपंग कर्मचारी म्हणून लाभ घेत आहेत. यामुळे खऱ्या अपंग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. परिणामत: खऱ्या अपंगांना लाभ मिळण्यासाठी सर्व अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बोर्डाकडून फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी, कर्मचारी संघटनेचे राज्य संचालक काशिनाथ ढोमणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व अपंग आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.अपंग कर्मचारी यांना शासनाने अपंग वाहतूक भत्ता, व्यवसायकरातून सुट, पदोन्नतीत ३ टक्के आरक्षण, नियुक्तीत ३ टक्के आरक्षण, बदली मध्ये सुट व सवलती, निवडणूक कामातून सुट यासारख्या विविध सोयी-सवलती लागू केल्या आहेत. या सवलती खऱ्या व नैसर्गीक अपंगांना मंजूर करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी, कर्मचारी संघटना मुंबईच्या वतीने सतत प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या सहा-सात वर्षापासून शंकास्पद व बोगस अपंग कर्मचारी यांचे प्रमाण अचानक वाढले आहेत. शासनाने सन २०१२ मध्ये अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील १ भाग मधील तरतुदीनुसार अपंग कर्मचारी, शिक्षक यांना प्रशासकीय बदली व समायोजन प्रक्रियेतून सूट दिल्याने या संधीचा फायदा घेवून जिल्ह्यातील कर्णबधीर, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग अपंग शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र अचानकपणे काढून जिल्हा परिषदमध्ये धुमाकूळ माजविलेला आहे. या अपंगामुळे खऱ्या नैसर्गीक अस्थिव्यंग, अंध, अल्पदृष्टी, कर्णबधीर प्रवर्गातील अपंगांना त्रास होत आहे. कोणतेही अपंगत्व नसताना बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नती सुद्धा मिळविली आहे. जिल्ह्यात सुमारे २०० ते २५०० बोगस अपंग शिक्षक, कर्मचारी या संधीचा फायदा घेत आहेत. ( प्रतिनिधी)