शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात ७५ टक्के ...

जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ५० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ७५ टक्के भरला आहे.

यापूर्वी या प्रकल्पातून उन्हाळी धान पिकांसाठी तीन टप्प्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी खरीप पिकांसाठी ही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती असली तरी शेतकरी वर्ग खरीप हंगामातील धान नर्सरी उन्हाच्या दाहकतेने कोमेजून जात आहेत. सुरूवातीच्या काळात पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी, आता मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल व चिंतातुर झाला आहे.

शेतकऱ्यांच्या धान नर्सरी व धान पीक रोवणी करीता बावनथडी प्रकल्पाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. मोहाडी तालुक्यातील, डोंगरगाव, कुशारी, काटेबाम्हणी, धोप, टाकला, उसर्रा, सालई (बू) ताडगाव, सालई (खु) सिहरी, मोरगाव महालगाव, नेरला, बपेरा, पालडोंगरी, टांगा, पिंपळगाव, अकोला टोला, आंधळगाव, मलिदा, आदी परिसरात पावसाने गेल्या कित्येक दिवसांपासून हुलकावणी दिली आहे. त्यामुळे प्रखर उन्हाने पेरणी केलेले धान नर्सरी कोमेजून गेले आहे.

बहुतेक शेतकऱ्यांच्या धान नर्सरी रोवणी योग्य आले असल्याने धान पीक लागवडीकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची गरज आहे. त्यातच पावसाअभावी धान नर्सरी मरणासन्न अवस्थेत सापडले आहे. व धान रोवणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतात पेरणी केलेल्या धान नर्सरी वाचविण्यासाठी व धान रोवणी करीता आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाचे पाणी खरीप हंगामात धान पिकाला सोडण्याची मागणी केली आहे अन्यथा डोंगरगाव व मोहाडी येथील चौकात शेतकऱ्यां‍सोबत आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष देवा ईलमे यांनी निवेदनातून दिला आहे.