शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

सव्वादोन लाख पशुधनाची घट

By admin | Updated: October 4, 2015 01:18 IST

जिल्ह्यातील बहुतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह गोपालन करणे आहे.

आज जागतिक पशु दिन : पशु दवाखाने ‘आॅक्सिजन’वर, कामांचा खेळखंडोबादेवानंद नंदेश्वर  भंडाराजिल्ह्यातील बहुतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह गोपालन करणे आहे. परंतु, निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे शेतकरी होरपळत असताना त्यांचा गोपालनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह सुरु आहे. मात्र अलिकडे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणारे पशु दवाखाने आॅक्सीजनवर असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी २००७ च्या पशुगणनेच्या तुलनेत २०१२ च्या गणनेत पशुधनांच्या संख्येत २ लाख ११,२३० ने घट झाली आहे.भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अखत्यारीत एकूण ८५ दवाखाने आहेत. यात ३२ दवाखाने हे जिल्हा पशुसंवर्धन पशु उपआयुक्त यांच्या अखत्यारीत तर ५३ दवाखान्यावर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे नियंत्रण आहे. भंडारा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातंर्गत ३२ दवाखाने आहेत. या उपआयुक्त कार्यालयाच्या कामासाठी जिल्ह्यात ११९ पदांना मंजूरी असली तरी यातील ३६ पदे रिक्त आहेत. सध्यास्थितीत ८३ पदे भरलेली आहेत. रिक्त पदांमध्ये ४ पशुधन विकास अधिकारी, ७ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, १२ परिचर, ३ व्रणोपचारक, पर्यवेक्षक व वरिष्ठ लिपिकांची प्रत्येकी दोन, तर अधिक्षक, लघुलेखक, वरिष्ठ सहायक, वाहन चालक, नाईक व शिपाईची प्रत्येकी एक पद रिक्त आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाची आहे. या विभागाकडून रिक्त पदांची माहिती मात्र कळू शकली नाही. जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात वरिष्ठ लिपीक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व परिचारांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कामांचा खेळखंडोबा होत असून जनावरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अखत्यारीत एकूण ८५ दवाखाने आहेत. यात ३२ दवाखाने हे जिल्हा पशुसंवर्धन पशु उपआयुक्त यांच्या अखत्यारीत आहे. यात श्रेणी १ चे १७ व श्रेणी २ चे १५ दवाखाने आहेत. ५३ दवाखान्यावर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे नियंत्रण आहे. यात श्रेणी १ चे १९, श्रेणी २ चे ३३ व एक फिरते चिकित्सालय आहे. जिल्ह्यात १ जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, ५ तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, १ जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, १ पशुधन तपासणी नाका असून ते साकोली येथे आहे. श्रेणी १ चे ११ राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने, श्रेणी २ चे १५ राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने, जिल्हा परिषदचे श्रेणी १चे १९ तर, श्रेणी २ चे ३३ दवाखाने आहेत. एक फिरत पशुचिकित्सालय आहे. दर पाच वर्षांनी होते पशुगणनापशुंची जनगणना दर पाच वर्षांनी होत असून २००७ च्या पशुगणनेच्या तुलनेत २०१२ च्या गणनेत पशुधनांची संख्या २ लाख ११ हजार २३० ने घट झाली आहे. सन २०१२ मध्ये १९ वी च्या पशुगणना जाहिर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ लाख ४८ हजार १०७ पशुधन होते. यात गायींची २ लाख ३८ हजार ७७४ आहे. यामध्ये ८१ हजार ९२२ संकरीत व १ लाख ५६ हजार ८४१ गावठी गायींचा समावेश आहे. तसेच म्हैस ९० हजार १६१, शेळ्या १ लाख ६१ हजार ५२८, मेंढ्या २ हजार ६८४, कोंबड्या २ लाख ७० हजार २५९, बदके ३२९, डुकरे २४९, घोडे २३, कुत्रे १० हजार ३५६ एवढे आहेत. सन २००७ च्या पशुगणनेप्रमाणे जिल्ह्यात ५ लक्ष ५९ हजार ३३७ पशुधन होते. याशिवाय कुक्कुटवर्गिय पक्षांची संख्या २ लक्ष ९२ हजार ६९० होती. या गणनेनुसार एकूण पशुधनापैकी गाय, बैल ४७ टक्के, म्हशी व रेडे १७ टक्के, शेळ्या, मेंढ्या ३७ टक्के , घोडे व सिंगरे ०.०२ व इतर पशुधन ०.१ टक्के होते.