शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात रेड अलर्ट

By admin | Updated: March 7, 2017 00:27 IST

मार्च ते मे या उन्हाळ्याच्या तीन महिन्यामध्ये वाघांची शिकार होण्याची भिती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे.

केंद्रीय वन्यजीव अन्वेषण विभागाने वर्तविली शिकारीची शक्यतासंजय साठवणे साकोलीमार्च ते मे या उन्हाळ्याच्या तीन महिन्यामध्ये वाघांची शिकार होण्याची भिती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वनकर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाघांना धोका निर्माण झाल्याचे केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने मागील आठवड्यात कळविले आहेत. त्यानुसार केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशातील सर्वच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांचा वाघाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, नागपूर जिल्ह्यातील पेंच, वर्धा जिल्ह्यातील बोर, गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध व नागझिरा या सहा व्याघ ्रप्रकल्पात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च ते मे या तीन महिन्यात सतत गस्त, सिमेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.उन्हाळ्यात वाघांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात यावे, स्थानिकांच्या हालचालीवर करडी नजर ठेवताना व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेलगतच्या गावात अनोळखी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गत पाच वर्षातील उन्हाळ्यात जंगलाना आगी लागुन मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली असून वन्यप्राणीही ध्जावले आहेत. यावेळी उन्हाळ्यात जंगलात तस्करांकडून जंगलांना आगी लावणे, सापळा रचून वन्यपशुची शिकार करणे, पाणवठ्यावर विषप्रयोग करण्ो, ट्रपद्वारे वाघांची हत्या करणे, आदिचे प्रमाण होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.