शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

२ एकरात २.५० लाखांचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:24 IST

शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत ....

चवळी शेंगांचे पीक : प्रगत शेतकरी वीरेंद्र मदनकर, धानाला उत्तम पर्यायमुखरू बागडे। लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादनाची किमया पालांदुरातील विरेंद्र मदनकर यांनी करून दाखविली आहे.शेती परवतडत नसल्याचे बोंब सगळीकडूनच कानावर ऐकू येताना दिसते. मात्र काही तरूण जोखीम पत्करत कृषी क्षेत्रात झालेले नवीन बदल स्विकारत काळ्या मातीतून बाजारात काय व केव्हा कसे विकणे याचा नजरअंदाज, अभ्यास घेत पिकपद्धत बदलवितात. याच सुत्राने विरू मदनकरने धान पिक कमी करू मागील ३ वर्षापासून बागायतीत शेंगाचे उत्पादन घेणे आरंभ केले. याकरीता मंगे घोडके व त्यांची टिम सदोचित नवीन अभ्यासासह शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात अग्रेसर आहेत. पालांदुरातील मंडळ कृषी कार्यालयामार्फत परिसरात विविध भाज्यांचे प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना शहाणे करणे सुरू आहे. बराचदा प्रोत्साहन निधी म्हणून वांगे, भेंडी उत्पादकांना याच कार्यालयामार्फत अनुदान दिल्या गेले हे येथे उल्लेखनीय. हल्ली विरू मदनकरच्या शेतात ३०-४० मजूर श्रम उपसत ४००-५०० चपकी चे उत्पादन सुरू आहे. मागील ४० दिवसापासून उत्पादन सुरू आहे. २० ते ४५ रूपये एवढा भाव भंडारा येथील मंडीत मिळत आहे. बंडू बारापात्रे यांचया प्रामाणिकतेने पालांदूर परिसरातील बागायती उत्पादकांना मोठा आधार मिळला असून रोजच नव नवे शेतकरी भंडाऱ्याला माल विक्रीला नेतात. विक्रीला अडचण नसल्याने शेतकरी तिथे माल विकणे पसंद करीत आहे. नगदी रक्कम हातात मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.चुलबंधच्या खोऱ्यात पाण्याची पातळी खूपच खोल गेल्याने अधिक जागेत धान पिक घेणे अवघड झाले आहे. जमिन आहे पण पाणी कमी झाल्याने बागायतीला पसंती वाढली आहे. स्थानिक बाजारात लहान व्यापारी माल विकत घेतात परंतू पैसेच देत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी मुस्कुटदाबी होत असते. यामुळे हक्काची बाजारपेठ म्हणून बीटीबी मंडीला अधिक महत्त्व आले आहे. मोठा पाऊस येईपर्यंत चवळी शेंग उत्पादन देतच राहणार असून हपत्याच्या सातही दिवस माल तोडणे सुरू आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मजुराकडून माल तोडून १० वाजेपर्यंत मंडिला माल पोहचविला जातो. नागपूर, वर्धा, बुटीबोरी, उमरेड भीसी व संपूर्ण भंडाऱ्या जिल्ह्यात मंडीतून माल विकल्या जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी धानपिकाला उत्तम पर्याय म्हणून बागायतीकडे वळून वांगे, भेंडी, चवळी, कोबी, कोहळा आदी पिकाकडे वळून कमी पाण्यात अधिक उत्पादनाची आस धरावी व विरेंद्र मदनकरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शेती कसावी.