शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

धारगावच्या जिल्हा बँकेला ‘लिंक फेल’चे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:56 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या भंडारा तालुक्यातील भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को आॅप. बँक लि. भंडारा शाखा धारगाव येथील व्यवहार गत आठवडाभरापासून 'लिंक फेल'मुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे खातेधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देखातेधारक त्रस्त : आठवडाभरापासून व्यवहार ठप्प, उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या भंडारा तालुक्यातील भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को आॅप. बँक लि. भंडारा शाखा धारगाव येथील व्यवहार गत आठवडाभरापासून 'लिंक फेल'मुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे खातेधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.भंडारा तालुक्यातील धारगाव येथे एकमेव जिल्हा बँक आहे. या बँकेत परिसरातील खुटसावरी, माडगी, टेकेपार, खुर्शीपार, राजेगाव, कन्हाळमोह, डव्वा, गुंथारा, चितापूर, धारगाव, कोकणागढ, खुर्शीपार, वाघबोडी आदी गावातील शेकडो नागरिकांचे खाते आहे. नागरिकांना या बँकेसोबत नेहमी व्यवहार करावा लागतो. मात्र गत आठवड्या भरापासून या बँकेत लिंक फेलचा फलक लावलेला आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना आल्यापावली घरी परतावे लागत आहे. यासंबंधी सोमवारला बँकेत फेरफटका मारला असता बँकेसमोर ग्राहकांची एकच गर्दी दिसून आली. बँकेत एका व्यवस्थापकासह तीन कर्मचारी उपस्थित होते. लिंक फेलविषयी एका महिला कर्मचाºयाशी चर्चा केली असता त्यांनी गत गुरूवारपासून लिंकफेल असल्यामुळे व्यवहार झालेला नाही. शनिवारला काहीवेळ व्यवहार सुधारित सुरू होता. रविवारला सुटी होती. आज सोमवार रोजी पुन्हा लिंक फेल आहे. त्यामुळे व्यवहार होणार नाही, असे सांगितले.एकंदरीतच परिसरातील खातेधारकांना सकाळपासूनच आर्थिक व्यवहार करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मात्र तांत्रिक कारण पुढे येत असल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागते.लिंक फेलच्या काळात उपाययोजना असावीइंटरनेटच्यायुगात लिंकफेल खातेदारांसाठी त्रासदायक ठरत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी असलेल्या जिल्हा बँकेने लिंक फेलदरम्यान ग्राहकांना ताटकळत न ठेवता त्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज व्यवहारासाठी येरझाºया मारणे परवडत नाही. त्यांना आर्थिक व शारीरिक त्रास होतो. याकडे जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी लक्ष केंद्रीत करून ग्राहकांच्या सेवेसाठी उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे.