शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रामभाऊंचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:27 IST

ज्या काळात रामभाऊ भारतीय जनता पक्षाशी जुळले तो प्रतिकुल काळ होता.

नितीन गडकरी : राम आस्वले स्मृतिनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमभंडारा : ज्या काळात रामभाऊ भारतीय जनता पक्षाशी जुळले तो प्रतिकुल काळ होता. त्या परिस्थितीत रामभाऊ समाजातील वंचितांसाठी धडपडत राहिले. मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतानाच पक्षाचे संघटन वाढविले. आजारपणाच्या काळात मनाने स्वस्थ वाटत असले तरी आजाराने त्यांचा पिच्छा सोडला नाही, त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले, अशा शब्दात केंद्रीय भूतल परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रामभाऊंना श्रद्धांजली वाहिली. माजी आमदार स्व.राम आस्वले यांच्या स्मृतिनिमित्त भाजपच्यावतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, आ.रामचंद्र अवसरे, उपस्थित होते. रामभाऊंच्या आठवणींना उजाळा देताना ना.गडकरी म्हणाले, १९७० च्या दशकात रामभाऊ पुण्यात शिकत असताना अभाविपशी जुळले. त्यावेळी ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण करून रामभाऊ भंडाऱ्यात आले. आणि भाजपच्या संघटनवाढीसाठी त्यांनी जीव ओतून काम केले. १९९५ मध्ये आम्ही दोघे आमदार म्हणून सोबत होतो. मित्र म्हणून माझा त्यांच्याशी व कुटूंबीयांशी जवळचा संबंध होता. १० वर्षापूर्वी रामभाऊ आजारी पडले. जेव्हाजेव्हा मी भंडाऱ्यात येत होतो, त्या प्रत्येकवेळी रामभाऊंना आवर्जून भेटायचो. त्यांची प्रकृती सुधारेल यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांशी भेटी घेतल्या, परंतु आजारावर उपाय मिळू शकला नाही. रामभाऊ आज आपल्यात नाही, याचे अतिव दु:ख आहे. परंतु नवीन कार्यकर्त्यांनी रामभाऊंचे संघटन कौशल्य नजरेसमोर ठेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न झटले पाहिजे. रामभाऊंनी जी प्रतिकुल परिस्थिती बघितली तशी स्थिती आज नाही. कार्यकर्त्यांनी राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न बाळगून जनसामान्यांची नाळ ज़ुळवून ठेवली पाहिजे. यानिमित्ताने आपण नवनिर्माणाचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला तर खऱ्या अर्थाने रामभाऊंना श्रद्धांजली ठरेल, असे शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी श्रद्धांजलीपर भाषणात ना. राजकुमार बडोले, तारीक कुरेशी यांनी रामभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. शेवटी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेचे संचालन डॉ.प्रकाश मालगावे यांनी तर आभारप्रदर्शन रामचंद्र अवसरे यांनी केले. यावेळी शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, भाजपचे सुनिल मेंढे, संजय कुंभलकर, बाबू ठवकर, आबिद सिद्धीकी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व रामभाऊंवर प्रेम करणारा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. (जिल्हा प्रतिनिधी)