शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

पावसाची पाठ; पेरणी खोळंबली

By admin | Updated: August 12, 2016 00:22 IST

मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने ऐन पेरणीच्या वेळेतच दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.

दुबार पेरणीचे संकट : बळीराजा हवालदिल, अर्धेअधिक क्षेत्र पेरणीविना देवानंद नंदेश्वर भंडारा मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने ऐन पेरणीच्या वेळेतच दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. पेरणीला आवश्यक असणारा पाऊस कोसळला नाही तर शेतीची पेरणी कशी करायची, अशी भिती शेतकऱ्यांमध्ये आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत १ लाख १८ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत ५६.७६ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. सुरवातीला पडलेल्या पावसामुळे भातरोपे रोवणी योग्य झाली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रोवणीला सुरवातही केली होती पण एैन रोवणीतच पावसाने दडी मारली आणि शेतीची कामे खोळंबली आहेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दडी मारली आहे. ऐन आॅगस्ट महिन्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकरीराजा हतबल झाला आहे. मात्र रोवणीयोग्य भातरोपे झाल्याने रोवणी पूर्ण करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे शेवटी नदी, नाले, पाट आदीचे वाहते पाणी भात शेतीकडे वळवून रोवणी उरकण्यात येत आहे. हवामान खात्यातर्फे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जोरदार पावसाची लक्षणे शेतकरीराजालाही दिसत नाहीत. त्यामुळे पाटाच्या पाण्यावरच पुढील शेती अवलंबुन रहाणार असल्याचे बोलले जात आहे. नदी, नाले, वाहत्या पाण्याशेजारी असलेली शेतीची कामे उरकण्यात येत असली, तरी वरथेंबी शेतीचे भवितव्य मात्र धोक्यात आले आहे. जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ७६२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ९६ हजार ३०४.२८ हेक्टर क्षेत्रात रोवणी लागवड केलेली आहे. यात भंडारा तालुक्यात १२ हजार ९२ हेक्टर, मोहाडी ९,४०९, तुमसर १४,४७७, पवनी १९,१९४, साकोली १३,१२०, लाखनी १०,७४५, लाखांदूर १७,२६७ हेक्टरचा समावेश आहे. रोवणी करणाऱ्या मजुरांची मजुरी कडाडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ बियाने खते किटकनाशकांच्या दरात वाढ झाली जिल्ह्यात १८ हजार २७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार ९१.४२ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९३.९२ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात २,६४२ हेक्टर, पवनी २,४९२ हेक्टर, मोहाडी २,८९५ हेक्टर, तुमसर २,९४०, साकोली १,६९४, लाखांदूर २,४०८ तर लाखनी तालुक्यात २,०२०हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांनी ८ हजार २८४ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केली. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखांदूर तालुक्यात असून २,००८ हेक्टर आहे. भंडारा ३८ हेक्टर, पवनी १,७७५, मोहाडी ५०, तुमसर ९०, साकोली १,५५१ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. यासह जिल्ह्यात तुर १,०४२.५० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी ११०.९२ आहे. यासह मुंग ३.५० हेक्टर, तीळ १८१.२०, सोयाबिन १,००५, हळद ३७६, कापूस ६९०.२०, तर भाजिपाल्यांची ९४५ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे़