शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार लाख १६ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:14 IST

आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत ४ लाख १६ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १३ हजार ७७८ शेतकऱ्यांनी धान विकला असून या धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८१५ रुपये आहे. त्यापैकी सुमारे ४७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे४७ कोटींचे चुकारे : गतवर्षीपेक्षा धानाची आतापर्यंत दुप्पट विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत ४ लाख १६ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १३ हजार ७७८ शेतकऱ्यांनी धान विकला असून या धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८१५ रुपये आहे. त्यापैकी सुमारे ४७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. गतवर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४६ हजार धानाची खरेदी झाली होती. यंदा याच कालावधीत दुप्पट खरेदी झाली आहे. दुष्काळाशी सामना करीत शेतकºयांनी पिकविलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर मात्र शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.भंडारा जिल्ह्यात अपुºया पावसाने यावर्षी धानपीक धोक्यात आले होते. त्यानंतरही शेतकºयांनी सिंचन करून धान पिकविला. जिल्ह्यात ६७ केंद्रावर आधारभूत किमतीत धान खरेदी केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रावर शेतकरी केवळ साधारण प्रतीचाच धान आणत असल्याचे दिसून येते. ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १६ हजार ५२७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यात भंडारा तालुक्यात ९ हजार ५५७ क्विंटल, मोहाडी ४० हजार १०८ क्विंटल, तुमसर ८८ हजार ९२१ क्विंटल, लाखनी ७९ हजार ३८७ क्विंटल, साकोली ८४ हजार ९५ क्विंटल, लाखांदूर ८७ हजार ८८२ क्विंटल, पवनी २६ हजार ५७५ क्विंटल धानाचा समावेश आहे. या सर्व धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८२५ रुपये आहे. त्यापैकी ४७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. तर सुमारे २५ कोटी रुपये लवकरच शेतकºयांच्या खात्यात वळते केले जातील.भंडारा जिल्ह्यात पणन महासंघाचे ६७ केंद्र मंजूर झाले असून सर्वच केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरु आहे. त्यात भंडारा ३, मोहाडी ९, तुमसर १५, लाखनी ११, साकोली १२, लाखांदूर १२ आणि पवनी येथील पाच केंद्रांचा समावेश आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाची दुप्पट खरेदी झाली असून वेळेवर पैसे मिळत असल्याचे पणन महासंघाच्या वतीने सांगितले जात आहे .मात्र धान खरेदी केंद्रावर शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बारदाना आणि गोदामाचा प्रश्न कायम आहे.धान साठविण्याची समस्याआधारभूत केंद्रावर खरेदी झालेला धान साठविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी गोदाम अपुरे पडत आहेत. त्याचा परिणाम खरेदीवर होत असल्याचे दिसून येते. अनेक केंद्रावर शेतकरी १५ ते २० दिवसांपासून धान खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकºयांचा धान उघड्यावर आहे. त्यातच आता बारदाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. जुना बारदाना केंद्रावर पोहचल्याने त्यातील अर्धेअधिक पोते फाटके निघत असल्याच्या तक्रारी आहेत.आधारभूत धान केंद्रावर यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पट खरेदी झाली आहे. खरेदीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात वळती केली जात असून आतापर्यंत ४७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.-गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.