शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांसाठी जनजागृती आवश्यक

By admin | Updated: April 18, 2015 00:23 IST

वने, वन्यजीव, नद्या अशा नैसर्गिक स्त्रोताचे जतन करणे काळाची गरज झाली आहे.

कार्यशाळा : जी.जे. अकर्ते यांचे प्रतिपादनभंडारा : वने, वन्यजीव, नद्या अशा नैसर्गिक स्त्रोताचे जतन करणे काळाची गरज झाली आहे. मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे नैसर्गिक स्त्रोताचा ऱ्हास होतो आहे. मानवाला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी जनजागृती करावी लागेल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमुर्ती जी.जे. अकर्ते यांनी केले. भंडारा वन विभागातर्फे वन, वन्यजीव अपराध आणि संबंधित कायदे या विषयावर भंडारा जिल्ह्यातील न्यायधिश, वन विभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळाचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांची संयुक्त कार्यशाळा साकोली येथे घेण्यात आली. एम.बी. पटेल महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्य वन संरक्षक एस.जी. टेंभुर्णीकर यांनी भारतात विविध राज्यकर्त्यांच्या काळात वन संवर्धनाचे व संरक्षणाचे कायदे कसे होते आणि ते कसे बदलत गेले याबाबत माहिती दिली. वन ही उघडी संपत्ती आहे. यात घडलेले गुन्हे अशा ठिकाणी जिथे काही साक्षीदार नसतो. असे गुन्हे घडल्यावर त्यासाठी कागदपत्रे, पुरावे गोळा करणे जिकरीचे असते.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून वन गुन्हे न्यायालयात योग्य प्रकारे कसे सादर करावेत हे समजवून घ्यावे. कार्यशाळेला आमदार बाळा काशिवार यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अ‍ॅड. भारती डोंगरे यांनी वन गुन्हयासंबंधात न्यायालयात प्रकरण सादर करतांना कोणत्या त्रृटी असतात आणि त्या कशा प्रकारे टाळता येतील याबाबत मार्गदर्शन केले. अ‍ॅड. कार्तिक सुकूल यांनी गुन्हेगारांना जामिन मिळाल्यास तो रद्द करण्यासाठी कायदयात कोणत्या तरतूदी आहेत याविषयी माहिती दिली. मुख्य वन संरक्षक कार्यालयातील विधी सल्लागार अ‍ॅड. कविता भोंडगे यांनी प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर करतांना त्रृटी कशा प्रकारे टाळाव्यात या विषयी माहिती विषद केली. त्याच बरोबर दिल्लीस्थित वन्य जीव संरक्षण संस्था यांचे प्रतिनिधी नितीन देसाई यांनी चित्रफितीद्वारे वनगुन्हे, वाघांचे शिकार व त्यांच्या अवयवांची विल्हेवाट कशा प्रकारे लावली यांबाबत माहिती दिली. प्रास्ताविक गोंदिया वनजीव विभागाचे वन संरक्षक संजय ठवरे यांनी केले. ( प्रतिनिधी)