शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पाण्यासाठी भाकपचे उपोषण

By admin | Updated: February 16, 2016 00:42 IST

शहरात दुषित पाणी पुरवठा व मुबलक पाणी पुरवठा या मागणीला घेऊन आज भाकपचे नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले.

समस्या सुटता सुटेना : आश्वासनानंतर आंदोलन मागेभंडारा : शहरात दुषित पाणी पुरवठा व मुबलक पाणी पुरवठा या मागणीला घेऊन आज भाकपचे नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. भंडारा शहरातील बहुसंख्य नागरिकांना नगरपरिषदेमार्फत दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच काही ठिकाणी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराची लोकसंख्या व वाढते स्वरुप पाहता नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा संदर्भात नवीन यंत्रणा पुन:स्थापित केली नाही. आधीच नियोजनाचा अभाव त्यात नाग नदीच्या पाण्याचा शिरकाव वैनगंगेच्या नदीपात्रात होत असल्याने समस्येत अजून भर पडली आहे. दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाने सुजल निर्मल योजनेचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे नव्या योजनेच्या प्रारुपात पाठवायला हवे होते. मात्र ते मंजुरीसाठी गोंदिया कार्यालयात धुळखात आहे. परिणामी भंडारावासीयांना नवीन पाणीपुरवठा योजनेचा लाभ केव्हा मिळेल यात शंका व्यक्त केली जात आहे. प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाण्याचा उपयोग झाल्यास शहरात भूमिगत गटार योजना होऊ शकते. तसेच डासमुक्त व घाणमुक्त शहर निर्माण होऊन दुषित पाण्यापासूनही शहरवासीयांची सुटका होईल यात शंका नाही. मात्र पालिका प्रशासनाच्या अनियोजनामुळे ही समस्या सुटलेली नाही. दूषित पाण्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, पाणीपुरवठा योजनेचे नवीनीकरण करण्यात यावे, पंपींग स्टेशन, जलशुद्धीकरण संयंत्र नवीन लावण्यात यावे, चार नवीन जलकुंभ बांधण्यात यावे, आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन वसाहतीत जलवाहिनी घालण्यात यावी, प्रतिव्यक्ती पिण्याचे ७० लिटर शुद्ध पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी, वैनगंगा नदीतील दूषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.आज सकाळी १० वाजताच्या सुमारास त्रिमूर्ती चौकात भाकपचे नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु करण्यात आले. दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या संदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्याने सदर आंदोलन मागे घेत असल्याचे हिवराज उके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आंदोलनात वामनराव चांदेवार, रामकृष्ण जगदेवे, हरिदास जांगळे, सदानंद इलमे, माणिकराव कुकडकर, झुलन नंदागवळी, सायत्रा सहारे, पुष्पा तिघरे, शांता कनोजे, शशीकला मालोदे, आशा गजभिये यांच्यासह अनेक महिला पुरुष उपस्थित होते. (प्रतिनिधी)