शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

समस्या निकाली काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:40 IST

राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याशी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ-पुणे अंतर्गत असलेल्या राज्यातील पदाधिकाºयांनी भेट घेऊन चर्चा केली.

ठळक मुद्देपीयूष सिंह : कास्ट्राईब संघटनेची विभागीय आयुक्तांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याशी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ-पुणे अंतर्गत असलेल्या राज्यातील पदाधिकाºयांनी भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान त्यांनी शिष्टमंडळाला मागासवर्गीयांच्या समस्या तातडीने निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन दिले.मागासवर्गीय कर्मचाºयांच्या प्रलंबीत समस्याबाबत पियुष सिंह विभागीय आयुक्त अमरावती यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ- पुणे यांची विभागीय सभा घेण्यात आली. विभागीय सभेला विभागातील अधिकारी विभागातील सर्वच विभागातील अधिकारी व कार्यालयीन प्रमुख उपस्थित होते.सभेचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांनी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. प्रतिनिधी मंडळात उपमहासचिव (साप्रवि) (म.रा.) सूर्यभान हुमणे, राज्य सरचिटणीस गजानन थुल, अतिरिक्त महासचिव प्रभाकर जिवने, अमरावती विभागीय सचिव सुनिल तायडे, विभागीय अध्यक्ष वानखेडे, अमरावती जिल्हा अध्यक्ष अशोक तायडे, अकोला जिल्हा अध्यक्ष इंगळे, सचिव नितिन इमले, भंडारा जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, भंडारा जिल्हा सचिव हरिश्चंद्र धांडेकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ भोवते, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अचल दामले, विभागातील सर्व जिल्हा अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी उपस्थित होते.सभेत मागासवर्गीय कर्मचाºयांना समस्यांमध्ये प्रामुख्याने मागासवर्गीय कर्मचाºयांचे (वर्ग क,ड) अनुशेषानुसार पदोन्नती करण्यात यावी, सरळ सेवा भरती करतांनी मागसवर्गीयांचा अनुशेष भरावा, विभागातील मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे, पदोन्नतीची रिक्त पदांची माहिती संघटनेला पुरविण्यात यावी. अनुकंपाची पदे भरण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, वर्ग ४ च्या कर्मचाºयांचे सेवा जेष्ठतेनुसार व प्रवर्गानुसार पदोन्नती करण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नती व बदलीमधील अन्याय दुर करण्यात यावा. प्राथमिक शिक्षकांना २४ वर्षाची निवड श्रेणी देण्यात यावी, सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना १२ वर्षे व २४ वर्ष कालबध्द व आश्वासीत योजनेचा लाभ देण्यात यावा. विभागातील विस्थापीत झालेल्या शिक्षकांना योग्य न्याय देण्यात येवून खोटी माहिती व प्रमाणपत्रे देणाºया शिक्षकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आॅक्टोंबर २०१६ ला झालेल्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी दिलेल्या आदेशानुसार ‘समान काम समान वेतन’ देण्यात यावा. अति आवश्यक सेवा आरोग्य विभागातील आरोग्य सेविकेची रिक्त पदे सध्या एनएचएम अंतर्गत कार्यरत असणाºया कंत्राटी आरोग्य सेविकांना सेवाजेष्ठतेनुसार विना अट रिक्त पदांवर सामावुन घ्यावे, विभागातील बंधपत्रित आरोग्य सेविकांना नियमीत करण्याचे आदेश देण्यात यावे, यासह अनेक समस्यांवर सभेत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर अधिकाºयांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.