शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पटेल महाविद्यालयात बक्षीस वितरण सोहळा

By admin | Updated: April 10, 2016 00:30 IST

स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे विज्ञान मंडळ व प्राणिशास्त्र मंडळाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता.

विज्ञान शाखेचा उपक्रम : मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसाकोली : स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे विज्ञान मंडळ व प्राणिशास्त्र मंडळाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एस.एन. मोर कॉलेज तुमसरचे प्राचार्य डॉ.चेतन मसराम हे होते. व अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.ए. धोतरे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अंकिता पूर्णिये हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. विज्ञान मंडळाचे प्रभारी डॉ.एल.पी. नागपुरकर यांनी प्रास्ताविक व विज्ञान मंडळाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे स्वरुप व त्यांचा आढावा सांगितला. डॉ. सी.जे. खुणे यांनी प्राणीशास्त्र मंडळाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे व उपक्रमांचा आढावा सांगितला.डॉ.मसराम म्हणाले, विज्ञान शिक्षणाचे ग्लोबलायझेशन व आपल्या पुढील असलेली आव्हाने फार मोठी जरी असली तरी स्वत:मधील विविध कौशल्ये विकसित करावी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रातील शैक्षणिक व तांत्रिक कौशल्य आत्मसात करावी. कठोर परिश्रम व चोख तयारी असावी व वारंवार प्रयत्न केल्यास ते शक्य आहे.प्राचार्य एस.ए. धोतरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विज्ञान मंडळ हे अतिशय सक्रियतेने अनेक उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या दृष्टीने कार्य करीत असते. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन जीवनात प्रगती करावी व विविध कलागुणांचा विकास करावा, महाविद्यालयातर्फे नेहमीच सहकार्याची भूमिका राहील, असे प्रतिपादित केले.बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थ्यांना पोस्टर स्पर्धेची १० बक्षिसे, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ६ बक्षिसे व सेमीनार स्पर्धेची १२ बक्षिसे पाहुण्यांच्या हस्ते वितरित करून त्यांचा गौरव करण्यात आला. पोस्टर स्पर्धेत प्रथम ज्योत्स्ना परशुरामकर, द्वितीय रोशनी गडारिया व प्रणोती बारसागडे, तृतीय भाग्यश्री पटले व रिया बोदेले, सेमीनार स्पर्धेत प्रथम अंकिता पूर्णिये, द्वितीय नेहा हटवार व विक्की गणवीर, तृतीय भारती गुरनानी व अक्षय खेडीकर यांना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे पदवी परीक्षेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमात शैक्षणिक योगदान व इतर क्षेत्रातील प्रावीण्यपूर्ण वाटचालीबाबत विज्ञान शाखेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अंकीता पूर्णीये, श्रद्धा कापगते, अदिती जैन व प्रणोती जैन या बीएसस्सी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्राणिशास्त्र मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भित्तीचित्र व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षिसे प्रदान करण्यात आले.संचालन अंकिता पूर्णिये व अदिती जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती गुरनानी हिने केले. कार्यक्रमासाठी डॉ.से.जे. खुणे, डॉ.अशोक चुटे, डॉ.एफ.एम. निर्वाण, प्रा.राजीव मेश्राम, प्रा.अमीत जगीया, प्रा.धार्मिक गणवीर, एम.बी. राऊत, महेश शहारे, अक्षय राऊत, दीपाली पटले, नेहा हटवार यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)