शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शाईच्या प्रतीसाठी खासगी शिक्षकांचे वेतन अडवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

खाजगी प्राथमिक शिक्षक संघाची मागणी भंडारा : खासगी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे माहे एप्रिल ...

खाजगी प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

भंडारा : खासगी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे माहे एप्रिल २१च्या नियमित वेतनासाठी अनुदान मंजूर करून अनुदान देण्यात आले. मात्र शाईची मूळ प्रत कार्यालयाला अद्यापही प्राप्त झाली नसल्याने एप्रिलचे वेतन कोषागार कार्यालयात अडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाईच्या प्रतीसाठी शिक्षकांचे वेतन अडवू नये. तसेच डिजिटल प्रत ग्राह्य धरून वेतन मंजूर करण्याच्या मागणीसाठी खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त तसेच लेखा व कोषागार संचालक यांना २५ मे रोजी निवेदन दिले आहे.

राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एप्रिलच्या नियमित वेतनाकरिता महाराष्ट्र शासनाने मार्चच्या विधिमंडळात वेतन अनुदान मंजूर करून संबंधित विभागाला वेतन अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यानुसार नागपूर विभागातील प्राथमिक व माध्यमिक वेतनपथक अधीक्षक यांनी शाळांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे वेतन मंजूर करून बी. डी. एस. काढून जिल्हा कोषागार कार्यालयात बिल सादर केले आहे.

शिक्षक अनुदान मंजूर झाल्याची मूळ प्रत वेतन पथक कार्यालयाला अद्यापही प्राप्त झाली नसल्याने जिल्हा कोषागार कार्यालयाला वेतनाची मूळ प्रत जोडली नाही. त्यामुळे नागपूर विभागातील काही जिल्हा कोषागार कार्यालयांत शिक्षकांचे वेतन अडण्याची शक्यता असून, शाईच्या प्रतीशिवाय बिल मंजूर होणार नसल्याने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या कोरोना महामारीचा काळ असून, शासकीय कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचारी आळीपाळीने उपस्थित असून, बहुतेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश असल्याने सध्या ऑनलाईन कामे करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. अशा वेळी शाईची मूळ प्रत जोडली नाही म्हणून शिक्षकांना नियमित वेतनापासून वंचित ठेवणे उचित नाही.

यातच अनेक शिक्षक कोरोना योद्धा म्हणून कोविड सेंटर, कोरोना जनजागृती पथक, कोरोना लसीकरण केंद्र, आठवडी बाजाराचे पथक, जमावबंदी व संचारबंदी पथक, इत्यादी ठिकाणी कर्तव्य बजावत असून, या काळात अनेक शिक्षकांनी आपला जीव गमावला आहे; तर बहुतांश शिक्षकांना कोरोनाची लागण होऊन पैशाअभावी योग्य उपचारांपासून मरणयातना भोगत आहेत. त्यामुळे संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना केवळ शाईच्या मूळ प्रतीसाठी वेतन बिल अडवून ठेवणे म्हणजे भ्रष्टाचाराला चालना देणे होय, असा आरोप शिक्षक संघटनेने केला असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वेतन अनुदानाच्या मूळ शाईच्या प्रतीसाठी शिक्षकांचे वेतन न अडविता ऑनलाईन प्राप्त झालेली डिजिटल प्रत ग्राह्य धरून वेतन पारित करावे.

असे खाजगी प्राथमिक शिक्षक संघांचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर, केंद्रीय सचिव विजय नंदनवार, संजय बोरगावकर, ज्ञानेश्वर वाघ, मोहन सोमकुवर, रहेमतुल्लाह खान, विलास खोब्रागडे, राजकुमार शेंडे, दारासिंग चव्हाण, धनवीर कानेकर, विजय आगरकर, पवन नेटे, ज्ञानेश्वर घंगारे, गोपाल मुऱ्हेकर, इत्यादींनी निवेदन दिले आहे.