शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे ...

या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, आदी बाबींकरिता नुकसानभरपाई देय आहे. योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची मुदतवाढ २३ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) सन २०२१-२२ अंतर्गत धान व सोयाबीन दोन्ही पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत आहे. भंडारा जिल्ह्याकरिता एचडीएफसी इर्गो इन्सुरंस क. लि. मुंबई ही इन्सुरंस कंपनी निश्चित झालेली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत धान पीक (खरीप हंगाम) करिता शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्त्याची रक्कम रुपये ७६० प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये ३८,००० हजार रुपये प्रति हेक्टर आहे. तसेच सोयाबीन पीक (खरीप हंगाम)करिता विमा हप्त्याची रक्कम रुपये ५५० प्रति हेक्टर असून, विमा संरक्षित रक्कम रुपये २७,५०० प्रति हेक्टर आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्र, पिके, विमा हप्ता व योजनेच्या इतर तपशिलाकरिता क्रॉप इंशुरन्स हे मोबाईल ॲप शेतकऱ्यांकरिता मराठी भाषेमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून योजनेबाबत माहिती वेळोवळी शेतकऱ्यांना पाहता येणार आहे.

बॉक्स

पावसाच्या दडीमुळे पीक विम्याकडे वाढला कल

जुलै महिना संपत आला तरी अद्यापही जोरदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने जिल्ह्यात धान राेवणीची कामे रखडली आहेत. अवर्षणाची स्थिती असल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत ८० हजारांच्या आसपास शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेकडे कल वाढला असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. पिकांची पेरणी न झाल्याने होणारे नुकसान, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूरक्षेत्र, जलमय होणे, भूस्खलन, आदी बाबींमध्ये उत्पादनात येणारी घट पीक विम्यासाठी ग्राह्य धरण्यात येते.

कोट

गतवर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सन २०२१- २२ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग होण्यासाठी शासनाने २३ जुलै २०२१ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे.

हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा