शेतकऱ्यांना मिळणार कॅश क्रॉफ्टचा लाभ : चरण वाघमारे यांची माहितीतुमसर : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाचा प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून बावनथडी प्रकल्प अधिनस्त असलेल्या शेतकरी बांधवांना विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅश क्रॉप योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली आहे.बावनथडी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून एकूण १४०० खातेदारांना थेट वाटाघाटीने जमिनीचा मोबदला उपलब्ध करून देण्याची शासन प्रशासनाची प्रत्यक्षरित्या कार्यवाही सुरू आहे. जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी ज्या शेतकरी बांधवांनी संबंधित विभागाकडे रितसर तक्रारी सादर केल्या आहेत, अशा पात्र शेतकरी बांधवांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आ. चरण वाघमारे यांनी संबंधित यंत्रनेस दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सिंचन मंत्री गिरीष महाजन यांच्या न ेनेतृत्वातील भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रणीत युती शासनाने आपल्या दीड दोन वर्षाच्या कालावधीत बावनथडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून येत्या २०१७ वर्षापर्यंत बावनथडी प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यास केंद्रस्तरावर सरकार कटीबद्ध आहे. बरीच कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा कृती संकल्प करण्यात आला आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांचा विकास करण्यासाठी बावनथडी प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेत करण्यात आला असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कॅश क्रॉप योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बावनथडी प्रकल्पाचा प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेत समावेश
By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST