शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सात जणांचे प्राण वाचविणारा अभिमान प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:18 IST

भरधाव काळी-पिवळी जीप ४० फुट उंच पुलावरून चुलबंद नदीत कोसळली. एकच हल्लकल्लोळ झाला. वाचवा वाचवा असे जीवाच्या आकांताने ओरडने सुरू झाले. त्याच जीपमध्ये अभिमान सतीमेश्रामही प्रवास करीत होता.

ठळक मुद्देकुंभली येथील अपघात : जखमी होवूनही वाहनात अडकलेल्यांना काढले सुखरूप बाहेर

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भरधाव काळी-पिवळी जीप ४० फुट उंच पुलावरून चुलबंद नदीत कोसळली. एकच हल्लकल्लोळ झाला. वाचवा वाचवा असे जीवाच्या आकांताने ओरडने सुरू झाले. त्याच जीपमध्ये अभिमान सतीमेश्रामही प्रवास करीत होता. स्वत:चे मरण डोळ्याने बघणाऱ्या अभिमानने एवढ्या भीषण अपघातातही धीर न सोडता जखमी होवूनही अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या या प्रयत्नामुळे सात जणांचे प्राण वाचले. प्रसंगावधान राखून मरणाच्या दारेतून सुटका करणारा अभिमानचा मात्र कोणी गौरव केला नाही. प्रशासनानेही त्याच्या या शौर्याची दखल घेतली नाही. कुणी दखल घेतली नसली तरी सात जणांचे प्राण वाचविण्याचे समाधान आजही अभिमानच्या चेहºयावर दिसते.साकोली तालुक्यातील कुंभली येथे १८ जून रोजी पुलावरून काळी-पिवळी जीप कोसळून सहा जणांचे बळी गेले तर सात जण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. याच अपघातग्रस्त जीपमधून सासरा येथील अभिमान सतीमेश्राम आपल्या पत्नीसह प्रवास करीत होता. सासºयाची तेरवी आटोपून सेंदुरवाफा येथे येथून पत्नी वंदनासोबत परतीच्या प्रवासाला होता. साकोली येथून काळी-पिवळी जीपमध्ये तो पत्नीसह बसला होता. चुलबंद नदीवर चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप ४० फुट खोल नदीत कोसळली. अभिमानही या जीपसोबत खाली कोसळला. चालकाच्या बाजूला बसून असल्याने त्याला कमी प्रमाणात मार लागला. चालक तर पळून गेला होता. मात्र अभिमानने प्रसंगावधान राखून त्याच क्षणी जीपमध्ये अडकलेल्या एक एक प्रवाशाला बाहेर काढणे सुरू केले. अर्ध्या तासानंतर मदत पोहचली. मात्र अभिमानने समयसुचकता दाखविल्याने सात जणांचे प्राण वाचले.प्रस्तुत प्रतिनिधीने त्याची भेट घेतली असता अभिमान म्हणाला, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांचे प्राण वाचविता आले असते तर सार्थक झाले असते. परुं नियतीपुढे कुणाचेही काही चालत नाही, असे तो म्हणाला.सहा जणांचे प्राण वाचविल्यानंतरही अभिमानची कुणी दखल घेतली नाही. प्रशासनानेही त्याचा कुठे गौरव केला नाही. यावर अशिक्षित असलेला अभिमान म्हणाला, मी कोणत्याही पुरस्काराची आशा केली नाही. ज्या सात जणांचे प्राण वाचविले तोच माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. साकोली तालुक्यासाठी अभिमान असलेल्या अभिमान सतीमेश्रामचा प्रशासनाने योग्य गौरव करावा, अशी मागणी होत आहे.पुरस्काराची आशा नाहीसाकोली तालुक्यासाठी अभिमान ठरलेला अभिमान सतीमेश्रामला कोणत्याही पुरस्काराची आशा नाही. आपण आपले कर्तव्य पार पाडले. पुरस्कार किंवा बक्षीस मिळून काय होणार. त्या सहा जणांचे प्राण वाचले असते तर तोच खरा माझ्यासाठी पुरस्कार होता, असे तो सांगतो. मात्र प्रशासनाने शौर्याची दखल घेत पुरस्कृत करावे, अशी अपेक्षा आहे.असा झाला अपघातसाकोलीवरून प्रवासी घेऊन काळी-पिवळी जीप लाखांदूरकडे निघाली. कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलाजवळ चालक अचानक घाबरला. जीपचे स्पेरिंग इकडे तिकडे फिरू लागला. काही तरी अचानक बिघाड झाला असावा. जीपचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच गेला. पाहता पाहता जीपचे दोन्ही चाक पुलाच्या खाली गेले. काही क्षणातच जीप नदीत कोसळली. नेमकी जीप कशी कोसळली हे आता सांगता येत नाही, असे अभिमान सतीमेश्राम म्हणाला. नदीपात्रात जीप पडताच चालकाने दार उघडले आणि उडी मारून पसार झाला. मी मात्र त्याच्याजवळच बसून होतो. वाचवा वाचवा असा आवाज ऐकून भानावर आलो आणि काही विचार न करता जखमींना बाहेर काढणे सुरू केले.