शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रेडझोन गावांसाठी कृती आराखडा तयार करा

By admin | Updated: August 3, 2014 23:09 IST

नदी काठावरील गावांचे पुरामुळे दरवर्षी नुकसान होते. अशा रेडझोनमध्ये येणाऱ्या गावासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करावा. पावसाळ्यात धरणाचे

आपत्ती निवारण समितीची सभा : पालकमंत्री राजेंद्र मुळक यांची सूचनाभंडारा : नदी काठावरील गावांचे पुरामुळे दरवर्षी नुकसान होते. अशा रेडझोनमध्ये येणाऱ्या गावासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करावा. पावसाळ्यात धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी महसूल विभागाला पूर्वसूचना द्याव्यात. जेणेकरुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा व खबरदारीचे उपाय करण्यास पुरेसा अवधि मिळेल. जिल्ह्यात कुठलीही आपत्ती आली तरी यंत्रणा तयार असावी. अशा पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ना.मुळक बोलत होते. यावेळी आमदार अनिल बावनकर, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक कैलास कणसे, विदर्भ जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल उपस्थित होते.नुकसान भरपाई देण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोणते मामा तलाव फुटण्यासारखे आहेत याचा आढावा घेऊन त्याची तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, म्हणजे सिंदपुरी सारख्या घटना टाळता येतील, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.गोसीखुर्द पॅकेज वाटपासंदर्भात आतापर्यंत ७ हजार ७५७ खाते धारकांपैकी ६ हजार ७८३ खातेधारकांना १८८ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. काही खातेदारांच्या सातबारावर अनेक नातेवाईकांची नावे असल्याने त्यांचे संमती नसल्यामुळे ती रक्कम अद्याप वाटप करावयाची आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी दिली. तसेच गोसीखुर्द पॅकेज वाटप करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे वाटप करण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार अशी अनेक पदे रिक्त असल्याची माहिती दिली. पावसाचे दिवस असल्यामुळे महावितरण मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असेही पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महावितरणच्या सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विभाग प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)