शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केली प्राचार्याच्या विरोधात पोलीस तक्रार

By admin | Updated: October 27, 2016 00:32 IST

विद्यापीठ शुल्काच्या व्यतिरिक्त जास्त पैसे मागितले जात आहे, अशा प्रकारची तक्रार समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली.

लाखनी : विद्यापीठ शुल्काच्या व्यतिरिक्त जास्त पैसे मागितले जात आहे, अशा प्रकारची तक्रार समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करतात, याकडे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष आहे.ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेता यावे, या उदात्त हेतूने १९६५ साली समर्थ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. २००५ पर्यंत या महाविद्यालयाचा हेतू निस्वार्थ होता. संघ विचाराचे माहेरघर म्हणून महाविद्यालयाची प्रचिती होती. संघ विचाराने चालणाऱ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट होत आहे. परंतु आज या महाविद्यालयाला जणू ग्रहण लागले की काय असे प्रकार उघडकीस येत आहे. समर्थ महाविद्यालय लाखनी येथील प्राचार्य संजय पोहरकर यांना संस्थेने निलंबित केले. त्यानंतर लाखनी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द भादंवि ४०८, ४०९, ४२०, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु आज समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली व प्राचार्याच्या विरोधात विद्यापीठ शुल्काच्या व्यतिरिक्त जास्त पैसे मागितले जात आहे, अशा प्रकारची तक्रार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली. विद्यापीठातंर्गत नियमित प्रवेश शुल्क लाल किंवा पिवळ्या रंगाची पावती आहे. परंतु नियमबाह्य शुल्क घेण्यासाठी पांढऱ्या रंगाची पावतीचा वापर प्राचार्यांमार्फत केला जातो. २००५ नंतर संजय पोहरकर प्राचार्य झाल्यानंतर अशा प्रकारच्या पावत्याचा वापर केला जात आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेवून अशा प्रकारच्या शुल्क बद्दल विचारणा केली असता, त्यांनी या शुल्कबद्दल नियमबाह्य आहे असे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी काल,मंगळवार रोजी लाखनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करतात, याकडे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)