शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

तलावाचे सौंदर्य धोक्यात

By admin | Updated: May 31, 2014 23:18 IST

शहरातील संत कबीर वॉर्डात असलेला सागर तलाव परिसराची शान आहे. अजान नागरिकांकडून या तलावात कचरा टाकणे सुरु असल्यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तलावातील पाणी दूषित झाले असून

भंडारा : शहरातील संत कबीर वॉर्डात असलेला सागर तलाव परिसराची शान आहे. अजान नागरिकांकडून या तलावात कचरा टाकणे सुरु असल्यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तलावातील पाणी दूषित झाले असून परिसरातही घाण पसरली आहे. शहरात मोजके तलाव असताना त्याचे सौंदर्य राखता येत नसेल तर ते दुर्दैवी आहे.शहरातील तलावांपैकी सागर तलावा हा महत्त्वाचा तलाव आहे. सर्वात मोठा तलाव असलेल्या या तलावात वर्षभर पाणी राहते. शहराच्या इतिहासातही सागर तलावाची नोंद आहे. परंतु तलावाच्या दुर्दशेकडे कुणाचेही लक्ष जात नाही. तलावाच्या चौफेर घाण पसरली आहे. गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्ठमी उत्सवात शहरातील भाविक विसर्जनासाठी येतात. त्यावेळी या तलाव परिसराला जत्रेचे स्वरुप येते. या वॉर्डातील तलावाची साफसफाई कधी करण्यात येत नाही. या वॉर्डातील शौचालय परिसरात घाण, फुटलेल्या नाल्या, जागोजागी साचलेला कचरा, डासांचा प्रादुर्भाव समस्या आहेत. या वॉर्डातील काही ठिकाणचे रस्ते उखडलेले आहेत. त्याचा आवागमनासाठी त्रास होतो. या वॉर्डात सामान्य कुटूंबातील नागरिक राहतात. या परिसरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली नाली मोठी आहे. परंतु नालीमधील गाळ नियमित साफ करण्यात येत नसल्यामुळे घाण वाढत आहे. सांडपाणी साचून राहत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. परिणामी डासांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या वॉर्डातील काही नागरिकांशी चर्चा केली असता ते म्हणाले, या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. त्यामुळे वॉर्डातील चहूबाजुला घाण पसरली आहे. पावसाळ्यात जागोजागी पाणी साचलेले असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. याच वॉर्डात जिल्हा सामान्य रुग्णालय असून या परिसरातील घाणीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.      (शहर प्रतिनिधी)