शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

डॉक्टरकीच्या नावावर लूट

By admin | Updated: June 28, 2014 00:58 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात ४० गावांचा समावेश होतो. या गावातील बहुतांश नागरिक, शेतकरी, शेतमजूर असल्यामुळे ...

अड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात ४० गावांचा समावेश होतो. या गावातील बहुतांश नागरिक, शेतकरी, शेतमजूर असल्यामुळे या गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटून सामान्य गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु केला आहे. अड्याळ परिसरात २० हून अधिक बोगस डॉक्टरांची संख्या, बोगस डॉक्टरांमुळे परिसरात गर्भपाताची संख्या उंचावली आहे. अड्याळ येथील काही औषध विक्रेत्यांशी बोगस डॉक्टरांसोबत साठगाठ असल्याची माहिती आहे.रोगांचे योग्य निदान होेऊन आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी प्रशिक्षण महाविद्यालये शासनस्तरावर उघडण्यात आली आहेत. यामध्ये लाखो रुपये खर्च करून विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना डॉक्टर ही पदवी देऊन समाजातील रुग्णांची सेवा करण्यासाठी संधी मिळते. तर दुसरीकडे भयानक व विदारक चित्र अड्याळ विभागात दिसत आहे. या डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषधही देण्यात येत आहे.या भागात एखाद्या औषधी विक्रेत्यांकडे किंवा डॉक्टरांकडे महिन्याकाठी वेतनावर काम करणारा व्यक्ती दोन ते तीन वर्ष काम केल्यानंतर स्वत:ला डॉक्टर समजवून बसतो. स्वत:ची बोगस दुकानदारी सजवून लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु करतो.अड्याळ व परिसरातील नेरला, चकारा, तिर्री, मिन्सी, कातुर्ली, केसलवाडा, सालेवाडा व नवेगाव व अन्य गाव परिसरात किमान २० हून अधिक अप्रशिक्षित म्हणजे बोगस डॉक्टरांनी अन्न औषध प्रशासन व पोलीस विभागाला न जुमानता राजरोसपणे गावागावात खुलेआम डॉक्टरकीचे फलक लावून दुकानदारी थाटली आहे. परिसरात गोर गरीब जनता जास्त असल्याने व गावातच डॉक्टर सहज उपब्ध होत असल्यामुळे या बोगस डॉक्टरांकडे रुग्णांची संख्या भरमसाठ आहे.ङ्क्तयातील काही बोगस डॉक्टर घरोघरी जावून औषधोपचार करतात. स्वत:जवळ अ‍ॅलोपॅथीक औषधे इंजेक्शन, सलाईन तसेच स्टेराईडच्या गोळ्या वापरून उपचार करतात. त्यामुळे औषधीचे वाईट परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेवर होऊन उपचाराला बळी पडत आहेत. औषध दुकानदार बोगस डॉक्टरांना चोरी छुपे औषध वितरीत करतात अशी माहिती आहे. प्रशिक्षित डॉक्टरांसारखे हे बोगस पदवीधारक डॉक्टर मोठ्या आजारापासून तर गर्भपातापर्यंतचे उपचार रुग्णांवर करीत आहेत. अशा अप्रशिक्षित डॉक्टरांकडून होत असलेल्या उपचारामुळे कित्येक रुग्णांना गंभीर आजाराला बळी पडावे लागले आहेत. अशा बोगस डॉक्टरांच्या अवैध दुकानदारीला हाणून पाडण्यासाठी अड्याळ परिसरातील गावागावात अन्न औषधी प्रशासन अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी अड्याळ परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)