शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

By admin | Updated: November 4, 2016 01:02 IST

आर्थिक अडचणीत सापडलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, साकोली, लाखनी, पवनी, भंडारा, तुमसर व मोहाडी

शेतकरी आर्थिक अडचणीत : उपाययोजनेची गरज, संध्या गभने यांची मागणीभंडारा : आर्थिक अडचणीत सापडलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, साकोली, लाखनी, पवनी, भंडारा, तुमसर व मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवाचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करून तमाम शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महिला एकता मंचच्या जिल्हा अध्यक्षा तथा मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या गभने यांनी केली आहे.मागील दोन तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पउत आहे तसेच धानपिक वातावरण बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पिक उत्पादनात घट येत आहे. शेतीच्या मशागतीपासून तर रोवणी, निंदण, खत, किड किटकनाशक औषधी, कापणी, बांधणी व मळणी अशा विविध स्तरावर उत्पादनापेक्षा जास्त खर्च येत असतो. तसेच शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या धानपिकाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शेती परवडेनाशी झाली आहे. एकेकाळी नफ्याची असलेली शेती आता तोट्यात जात असल्यामुळे बरेच शेतकरी बटई किंवा भाडे तत्वावर शेती देत आहेत. शेतीत राबराब राबून कोणताही विकास होत नसल्याने काही शेतकरी शेती व्यवसाय सोडून शहरात कामाच्या शोधासाठी गेलेले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते. तरीपण शेतकरी बांधव कर्जाच्या संकटातून बाहेर पडले नसून पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्यूवाहातून बाहेर काढण्यासाठी एक विशेष बाब म्हणून केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून व सम्यक विचार करून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, लाखनी, तुमसर व मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवाचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर, महिला एकता मंचच्या जिल्हा अध्यक्ष संध्या गभने यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)