शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाकरिता नियोजनाची गरज

By admin | Updated: September 27, 2015 00:32 IST

पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत.

आज पर्यटन दिन : पवनीत संधीपवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता पर्यटनात आहे. पण पर्यटनाचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर नियोजन करण्यात येत नसल्यामुळे पर्यटनाचा विकास झालेला नाही. पर्यटन क्षेत्र विकसित करण्याकरिता एक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.तालुक्यात विदर्भातील सर्वात मोठे महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण, रुयाड येथील पत्ता मेत्ता संघ द्वारा निर्मित आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधी महास्तुप, शहरातील प्राचीन, ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, टेंभेस्वामी मंदिर, वैजेश्वर मंदिर आदी पर्यटनस्थळांसोबत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी वन्यजीव वनक्षेत्र आदींचा समावेश आहे.मागील तीन चार वर्षापासून पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. रोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पवनी शहराचा पर्यटन शहराच्या रुपात विकास होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. या शहराचा रामटेकच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पूर्ण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. पर्यटन वाढेल त्यामुळे रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शहराचे गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे.ऐतिहासिक पवनी शहराची जनता ही शहरामध्ये पर्यटन वाढण्याच्या बाजूने आहे. येथील जनतेच्या भावना पर्यटनस्थळाच्या विकासाशी जुळलेल्या आहेत. मागील चार वर्षापासून शासनातर्फे पर्यटन विकासाचा कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही. ऐतिहासिक किल्ल्याखालील महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे तयार होत असलेले पर्यटन संकुल आठ दहा वर्षे झाले तरी अजून तयार झाले नाही. येथील पर्यटन स्थळाला शासनाच्या महत्वाच्या पर्यटनस्थळाच्या यादीत आणणे, पर्यटनस्थळांना शासन स्तरावर प्रसिद्धी देणे, पर्यटनस्थळाचा विकास करणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे आदी विषयावर विचार करून एक पर्यटन विकास आराखडा तयार करून शासनस्तरावर नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास होण्याला वेळ लागणार नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)