शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नाथजोगी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:36 IST

लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी या नाथजोगी समाजाच्या वस्तीला जिल्हाधिकारी कदम यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत वस्तीतील ...

लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी या नाथजोगी समाजाच्या वस्तीला जिल्हाधिकारी कदम यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत वस्तीतील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले. या वस्तीत जमिनीचे पट्टे, घरकूल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, महिला स्वयंरोजगार, जात पडताळणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ यासह शैक्षणिक समस्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत पुढे आले.

या वस्तीतील बहुतांश पुरुष बाहेरगावी भिक्षा मागणे आणि हस्तरेषा पाहण्यासाठी जातात. त्यामुळे लहान मुले आणि महिलाच या वस्तीत बहुतांशवेळा असतात. या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्नही कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या वस्तीची माहिती मिळताच त्यांनी थेट कोदामेढी वस्ती गाठून तेथील समस्या ऐकून घेत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

बॉक्स

नाथजोगींना मिळणार जगण्याचे बळ

जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तीतील अनेक घरांना भेटी दिल्या. तेथील महिला व लहान मुलांशी संवाद साधला. आरोग्याच्या दृष्टीने चौकशी केली. मुलांना नियमितपणे शाळेत पाठवावे, असा आग्रह त्यांनी धरला. अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आता या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच स्वत: पुढाकार घेतल्याने नाथजोगींना जगण्याचे बळ मिळाले आहे.