शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

उद्योजक विकासाचा आधारस्तंभ

By admin | Updated: September 28, 2016 00:41 IST

देशाची प्रगती उद्योगाच्या प्रगतीशिवाय शक्य नाही. म्हणून उद्योजक हा विकासाचा आधारस्तंभ आहे.

प्रमोद पाटील यांचे प्रतिपादन : एमआयईटीमध्ये उद्योजकता विकास कार्यशाळाशहापूर : देशाची प्रगती उद्योगाच्या प्रगतीशिवाय शक्य नाही. म्हणून उद्योजक हा विकासाचा आधारस्तंभ आहे. तरुण अभियंत्यानी केवळ रोजगाराच्या मागे न लागता उद्योजक बनुन रोजगाराची निर्मिती करावी. याकरिता कल्पकतेतुन उद्योगाची निर्मिती करावी. व त्याच्या विकासावर भर दयावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक प्रमोद पाटील यांनी केले. ते स्थानिक मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रद्ववारा आयोजित तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व एमआयईटी शहापूरच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी एमआयईटीचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे होते, तर प्रमुख अतिथी उद्योजक प्रमोद पाटील, अमित राव, पराग खापर्डे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद खडसकर, कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख प्रामुख्याने उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी खडसकर यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारच्या उद्योग विद्यार्थी सुरु करु शकतात. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांना उद्योगाकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांविषयी मार्गदर्शन त्यानी आपल्या भाषणात केले.एमआयईटीचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंउद्योग याकरिता संस्थेद्वारा राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देवून तरुण अभियंत्यांनी उद्योगाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना केले. कार्यशाळेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी गडेगाव व भंडारा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील विविध उद्योगांना भेटी देवून तिथे प्रत्यक्षात कसे काम होते यांची माहिती जाणून घेतली. उद्योजकता विकास कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. शाहिद शेख यांनी केले. संचालन प्रा. अमित मानापुरे व आभार प्रा. तारेन रहांगडाले यांनी केले. कार्यशाळेकरिता प्रा. अश्विनी लाडे, प्रा. पुष्पा चव्हाण, प्रा. चंद्रकांत चौधरी, प्रा. अमर भिवगडे, प्रा. ज्ञानेश लांजेवार व चमूने सहकार्य केले. (वार्ताहर)