शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
4
जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा अदानींनी त्यानंच बनवला रस्ता, पाहा डिटेल्स
5
MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!
6
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
7
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
8
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
9
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
10
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
11
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
12
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
13
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
14
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
15
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
16
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
17
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
18
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
19
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
20
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा

फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धांचे अर्थशास्त्र

By admin | Updated: April 14, 2016 00:46 IST

महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत.

श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन : ‘भारत गणराज्याचे विधिवत नामकरण’ ग्रंथाचे प्रकाशनभंडारा : महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत. सत्यशोधकी पत्रकारीतेचा पाया सुद्धा फुले-आंबेडकरांनी घातला. डॉ. आंबेडकर हे घटनात्मक नैतीकतेचे नाव आहे. ते धम्माला घटनेच्या नैतीकतेचे अधिष्टान देऊ इच्छित होते. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरीता फुले-आंबेडकर अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे. कारण फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धाचे अर्थशास्त्र सांगते, असे रोखठोक विचार प्रसिद्ध कवी व साहित्यचिंतक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे ११ एप्रिल रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित आजचे समाजवास्तव आणि फुले-आंबेडकरी विचार या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, महेंद्र गडकरी, अश्ववीर गजभिये, अमृत बन्सोड व निशांत राऊत होते. ते म्हणाले की, फुले-आंबेडकरी विचाराविरूद्ध सुरू असलेली प्रतीक्रांती हे आजचे समाजवास्तव आहे. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेती नद्याजोड प्रकल्पाची अंमलबजावणी न होणे, रोहित वेमुला आणि कन्हैय्याकुमार यांच्यावर सूडबुद्धीने कार्यवाही करणे, पुरोगामी दाभोळकर-पाणसरे-कलबुर्गी यांची हत्या करून फुले-आंबेडकरी विचार संपविण्याचा प्रयत्न करणे, विकासाच्या नावाखाली विनाशाचा दहशतवाद पसरविणे या सर्व घटना आजचे समाजवास्तव आहे. याप्रसंगी भारत गणराज्याचे विधिवत नामकरण या प्रा. अश्ववीर गजभिये लिखित ग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की, युनोमध्ये सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. म्हणजे ते विश्वमानव होते याचे प्रतीक आहे. आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत. ते परीपूर्ण मानव होते म्हणून त्यांचे निव्वळ व्यक्तीपूजक होण्यापेक्षा त्यांचे विचाराचे पुजक व्हायला पाहिजे. तसेच त्यांचे आर्थिक विचार अंगीकारून आर्थिक प्रगती आपण साधली पाहिजे. डॉ. अनिल नितनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर पाश्चिमात्य विचारवंत व तत्ववेते यांचा प्रभाव पडला असल्याचा उहापोह करून डॉ. आंबेडकर केवळ एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे, असे सांगितले. व्याख्यानाचे संचालन व प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी, आभार असित बागडे यांनी तर संयोजन गुलशन गजभिये यांनी केले. व्याख्यानाकरीता प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता समितीचे अध्यक्ष निशांत राऊत, सचिव अजय तांबे, महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, डॉ. रविंद्र वानखेडे, गुलशन गजभिये, प्रभाकर भोयर, डी.एफ. कोचे, संजय बन्सोड, अजय गडकरी, सुनित नगराळे, हरिश्चंद्र दहिवले, अमित उके, प्रशांत बागडे, प्रशांत सूर्यवंशी, संदेश शेेंडे, रूपचंद रामटेके, करण रामटेके, किशोर मेश्राम, शरद खोब्रागडे, शैलेश मेश्राम, मोनू गोस्वामी, अरुण अंबादे, नितीन मेश्राम, दिनेश गोस्वामी आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)