शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ३६५ वाहनधारकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:09 IST

हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी पोलीस आणि आरटीओने कठोर कारवाई करत हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या ३६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार दंड वसुल करण्यात आला. प्रशासनाने हेल्मेटसक्ती करताच अनेक नागरिक हेल्मेट घालून दुचाकी चालविताना शहरासह जिल्ह्यात दिसून आले.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : एक लाख ५५ हजार रुपये दंड वसूल, पोलिसांकडून मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी पोलीस आणि आरटीओने कठोर कारवाई करत हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या ३६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार दंड वसुल करण्यात आला. प्रशासनाने हेल्मेटसक्ती करताच अनेक नागरिक हेल्मेट घालून दुचाकी चालविताना शहरासह जिल्ह्यात दिसून आले.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात १ डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्याअंतर्गत शनिवारी सकाळपासूनच पोलिसांनी विविध ठिकाणी मोहीम राबविली. त्याअंतर्गत ३६५ व्यक्ती हेल्मेटविना दुचाकी चालवत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये वसुल करण्यात आला. तर आरटीओ विभागाने देखील ३६ वाहनधारकांना मेमो दिले आहे.पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून हेल्मेट न वापरणाºया दुचाकीचालकांना दंड ठोठावला. भंडारा शहरातही ही कारवाई करण्यात आली. शासकीय कार्यालयात नो हेल्मेट नो एन्ट्रीचा परिणाम शनिवारी दिसून आला. बहुतांश कर्मचारी हेल्मेट घालून कार्यालयात आल्याचे चित्र दिसत होते. हेल्मेट सक्तीमुळे अनेकांची धांदल उडाली असून नागरिक रस्त्यावर हेल्मेट विक्रीच्या दुकानात गर्दी करून असल्याचे शनिवारी दिसून आले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली आहे.जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून कौतूकहेल्मेट सक्तीच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी प्रशासनाला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल जिल्हाधिकारी शांतनू गोयल आणि पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी हेल्मेटचा वापर करणाºया दुचाकी स्वारांचे पुष्पगुच्छ देऊन कौतूक केले. मोटर वाहन अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.