रंगारी यांचे प्रतिपादन: साकोलीत शांतता समितीची सभासाकोली : जातीय दंगे व धर्मात तेढ निर्माण होणार नाही, याविषयी दक्ष असले पाहिजे व पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, शांतात व सुव्यवस्था प्रस्तापित ठेवण्यासाठी सर्वांकडून सहकार्य असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डी.जी. रंगारी यांनी केले. साकोली पोलीस ठाणे येथे शांतता समितीची सभा घेण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे तर, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक जगदिश गायकवाड आदी उपस्थित होते.याप्रसंगी जगदीश गायकवाड यांनी विविध धर्माचे सण येत आहेत. कधी कधी शांतता भंग पावत असते व कधी कोणाच्या चुकीमुळे जातीय दंगे होत असतात. यांना आळा बसावा व सर्वधर्म समान मानून जातीय सलोखा कसे टिकवून ठेवता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. डी.जी. रंगारी यांनी मानवता हा दृष्टीकोन ठेवून एकमेकाधर्माविषयी व जातीविषयी आपुलकीची भावना ठेवून मनात कोणतेही मतभेद न ठेवता मदत व सहकार्य करावे, असे आवाहन केले. राजश्री मुंगुलमारे, इंद्रायणी कापगते, आर.एम. अंबादे, ओम गायकवाड यांनीही साकोली शहरात शांतता कशी राहील, याविषयी मत व्यक्त केले. पोलीस उपविभागीय अधिकारी मोहनदास संखे यांनीही गावाच्या विकासासाठी व शांततेसाठी जनतेची सहकार्याची गरज आहे. गुन्हेगारीला आळा बसवा याकरिता प्रबोधनाची गरज आहे. प्रास्ताविक व संचालन हवालदार ग्यानीराम गोबाडे यांनी केले. आभार हवालदार पुरुषोत्तम भुतांगे यांनी केले. सभेला जिल्हा परिषद सदस्य अरुण बडोले, सभापती ताराबाई तरजुले, दुलीचंद कोसलकर, रशिद कुरेशी, हाजी शेख, शारदा लांजेवार, भीमावती पटले, सरपंच रसिका हत्तीमारे, सरपंच अशा शेंडे, विजय दुबे, हाजी शेख, भूमिता धकाते, जि.प. सदस्य गणवीर व शांतता व दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शांतता, सुव्यवस्थेसाठी सहकार्य गरजेचे
By admin | Updated: August 11, 2016 00:32 IST