शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पवनीचे विस्तार अधिकारी निलंबित

By admin | Updated: January 21, 2017 00:30 IST

पवनी पंचायत समितीअंतर्गत २५ बायोगॅस सयंत्र बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

बायोगॅस सयंत्र लक्षांक प्रकरण भंडारा : पवनी पंचायत समितीअंतर्गत २५ बायोगॅस सयंत्र बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, वर्षभरात लोकांना योजनांची माहिती न देता उद्दिष्टपूर्ती करण्याऐवजी केवळ एक यंत्र बांधले. यासोबतच वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे या आरोपाखाली पवनीचे विस्तार अधिकारी (कृषी) बी. आर. भोयर यांना आज तडकाफडकी निलंबीत केले. ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केली. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या कृषी विभागाला बायोगॅस सयंत्र बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात सर्व तालुक्यात सरासरी २५ सयंत्र असे जिल्ह्यात १७० बायोगॅस बांधायचे होते. यातील सर्व तालुक्यात समाधानकारक उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. माहे एप्रिल ते मार्च या वित्तीयवर्षांत हे बांधकाम करायचे आहे. पवनी वगळता उर्वरित तालुक्यात १८ ते २२ पर्यंत बायोगॅसचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मात्र, पवनी तालुक्यात एका सयंत्राचे बांधकाम झालेले आहे. दरम्यान जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे यांनी प्रत्येक महिन्यात बायोगॅस बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला. यात केवळ पवनी पंचायत समितीचे काम समाधानकारक आढळले नाही. याबाबत किरवे यांनी बी. आर. भोयर यांना दोनवेळा स्पष्टीकरण मागितले. मात्र, त्यांनी वरिष्ठांच्या पत्राची दखल घेतली नाही, किंवा बांधकामाची पूर्तता केली नाही. याबाबत कृषी विकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला. जगन्नाथ भोर यांनी आढावा बैठक घेतली. यात विस्तार अधिकारी (कृषी) भोयर यांचे काम असमाधानकारक वाटले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. (शहर प्रतिनिधी)शासनाने दिलेले उद्दिष्टपूर्ती करणे सर्व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. यात कामचुकारपणा खपवून घेणार नाही. अहवाल व सकृतदर्शनीत भोयर हे जबाबदार ठरले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबन काळात तुमसर पंचायत समिती त्यांचे मुख्यालय निश्चित केले आहे. - जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा.