शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आनंदनगरात पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: April 11, 2016 00:28 IST

दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर

भंडारा: दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत असतानाच गत १५ दिवसांपासून आनंद नगर तसेच एलआयजी व एमआईजी कॉलनीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याचे लक्षात आले. यापूर्वी म्हाडा कॉलनीतील नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांच्याकडे नागरिकांनी केली होती. ते प्रकरण पूर्ण होत नाही तर पाणीपुरवठा होत नसल्याचे दुसरे प्रकरण समोर आले आहे.भंडारा शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याचे चित्र सदर प्रकरणातून दिसून येते. काही वर्षापुर्वी पाणीपुरवठा मुबलक होत नसल्यामुळे तीन कोटी रुपये खर्च करून चेतन बंधारा बांधण्यात आला होता. त्यावेळी दोन वर्षात गोसेखुर्दचे काम पूर्ण होणार असतांनाही चेतन बंधारा बांधण्याचा घाट घालण्यात आला होता. चेतन बंधारा बनून सुद्धा नागरिकांना पाणी पुरवठा होत नव्हता. आता मात्र नदी तुडूंब भरली असतांनाही तीच परिस्थिती असणे आश्चर्यकारक बाब आहे. शहरातील आनंदनगर येथे नगरपालिकाकडून पाणी पुरवठा केल्या जाते. सद्या उन्हाळ्याचे दिवस असून नळाला पुरेसा प्रमाणात पाणी येत नाही. आनंदनगरात अनेकांच्या घरी पाणीपुरवठासाठी नळ लावण्यात आले आहेत. मात्र, नळाला पाणी येत नसल्याने येथील महिला पुरुषांना इतरत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेवून आनंदनगरातील पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)