शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवनी- कऱ्हांडला अभयारण्य ठरत आहे पर्यटकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

खापरी गेटमधून पर्यटकांना हमखास प्राण्यांचे दर्शन जंगल सफारीद्वारे होते. येथील घनदाट व ओपन जंगल असल्याने दूरपर्यंतचे प्राणी येथे पाहता येतात.  या जंगलात वाघीण आपल्या तीन पिल्ल्यांसह खापरी गेटच्या  आजूबाजूच्या परिसरात नेहमी फिरताना दिसते. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जंगलामध्ये ठीक ठिकाणी पाण्याचे टाके तयार केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात जंगली प्राण्यांचे नेहमीच पर्यटकांना आकर्षण राहिले आहे. या अरण्यात वाघ, चितळ, अस्वल, हरीण, मोर,  रानडुक्कर, नीलगाय, रानगवे असे विविध प्रकारचे जंगली प्राणी मुक्तपणे संचार करीत आहे. पर्यटकांना हमखासपणे या प्राण्यांचे दर्शन होईल असे हे जंगल आहे.पर्यटकांनी अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर गाईड अनेक जंगली तलावांमध्ये पर्यटकांना घेऊन जात असतात. या तलावात ठाणा, खापरी, बोरी, पानसरा, कोंरभी, पाऊनगाव, राणाई येथील जंगल तलाव विशेष आकर्षण ठरत आहेत. येथे वन्यप्राण्यांचे नेहमी आवागमण होत असते. त्यामुळे पर्यटकांना हमखास त्यांचे दर्शन होत असते. खापरी गेटमधून पर्यटकांना हमखास प्राण्यांचे दर्शन जंगल सफारीद्वारे होते. येथील घनदाट व ओपन जंगल असल्याने दूरपर्यंतचे प्राणी येथे पाहता येतात.  या जंगलात वाघीण आपल्या तीन पिल्ल्यांसह खापरी गेटच्या  आजूबाजूच्या परिसरात नेहमी फिरताना दिसते. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जंगलामध्ये ठीक ठिकाणी पाण्याचे टाके तयार केले आहेत. सौरऊर्जेवर जंगलामध्ये चालणारे अनेक बोर आहेत.  टाक्यांमध्ये पाणी साचल्याने प्राण्यांना दिवसभर पिण्याचे पाणी मिळते. यासाठी पवनी वन विभागाने प्राण्यांची व जंगलाची  सुरक्षेसाठी विविध उपाय योजना केल्या आहेत.

पट्टेदार वाघाचे दर्शन- एक पट्टेदार वाघ येथे आहे. या जंगलात १८  चितळ असून ते देखील पर्यटकांना दर्शन देतात. मोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात लांडोर व मोरांचे थवेच्या थवे पर्यटकांना आकर्षण करीत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हमखास या गेटमधून पर्यटकांनी जंगल सफारी केल्यास त्यांना येथील अनेक जातींचे वृक्ष मोहित करणार आहे. या अरण्यात अनेक जातीचे वृक्ष तसेच राम-लक्ष्मण दोन मोठे सागवान झाड आकर्षणाचे केंद्र आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ