शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

पक्षीय-सर्वपक्षीय राजकारणाने नेत्यांची दमछाक!

By admin | Updated: June 25, 2015 00:26 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि भंडारा अर्बन बँक निवडणुकीचे मागेपुढे बिगुल वाजले.

निवडणूक जिल्हा परिषद व अर्बन बँकेची : सहकारातील सर्वपक्षीय उमेदवारांना एकाच वाहनात बघून कार्यकर्ते अचंबितभंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि भंडारा अर्बन बँक निवडणुकीचे मागेपुढे बिगुल वाजले. आता या दोन्ही निवडणुका एका दिवसाच्या फरकाने होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय राजकारण तर सहकारातील सर्वपक्षीय राजकारणामुळे प्रचारात फिरताना नेत्यांची दमछाक होणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती काबीज करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसनेना हे प्रमुख राजकीय पक्ष रिंगणात उतरले आहेत. समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी गटातटावर मात करताना काहींना यश आले तर काहींना अपयश आले. त्यामुळे काही बंडखोरी करण्याचा प्रयत्नात आहेत. इतकी कसरत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांना करावी लागली आहे. उमेदवारी वाटपाची कसरत कुण्या एका पक्षातच झाली असे नाही, सर्वच पक्षात गटातटाचे राजकारण झाले. ४ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल ६ रोजी स्पष्ट होईलच.परंतु, त्यापाठोपाठ भंडारा अर्बन बँकेची निवडणूक ५ जुलै रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत गणपतराव बांगडकर, अ‍ॅड.नारायणराव तलमले यांच्या नेतृत्वात जनहीत पॅनेल, नाना पंचबुद्धे यांच्या नेतृत्वात गुर्जर पॅनेल तर जयंत वैरागडे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेल निवडणूक लढत आहेत. आतापर्यंत सत्तेत असलेल्या गुर्जर व सहकार पॅनेलच्या विरुद्ध जनहीत पॅनेलने बंड थोपटले आहे. जनहित पॅनेल वगळता अन्य दोन्ही पॅनेलमध्ये ‘एकमेका सहाय्य करु’ या भावनेतून सर्वपक्षीय उमेदवार सहकाराचे राजकारण करीत रिंगणात आहेत. अर्बन बँकेचे मतदार जिल्हाभरात विखुरले असून त्यांची मतदारसंख्या ५० हजाराच्यावर आहे. अर्बनच्या निवडणुकीत पॅनेलचा प्रचार करताना हे सर्वपक्षीय उमेदवार एकाच वाहनात बसून मिळून प्रचार करीत आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेची निवडणूक असल्यामुळे या उमेदवारांना एकाच वाहनात पाहून गावातील कार्यकर्ते अचंबित होत आहेत. गावात पोहोचल्यानंतर अर्बनचे उमेदवार एकाच वाहनातून उतरताना कार्यकर्त्यांना हे कुणाच्या प्रचारासाठी आले, असा संभ्रम निर्माण होत आहे. काही पक्षातून एकच उमेदवार बँकेत आणि जिल्हा परिषदेतही निवडणूक लढत आहेत. आता अर्बनच्या निवडणुकीत जे विरोधात आहेत. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या प्रचाराला जातील कां? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. बँकेच्या निवडणुकीत विरोध आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत समर्थन असे चित्र जिल्ह्यातील मतदारांना पहिल्यांदा अनुभवला मिळणार आहे.ग्रामपंचायत निवडणूकही तोंडावरग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणाची पहिली पायरी आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हांवर लढत नसली तरी गावागावांत राजकीय पदाधिकाऱ्यांचीच पॅनेल निवडणूक लढत असते. जिल्हा परिषद आणि अर्बन बँकेचे मतदारही गावागावांत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकाही तोंडावर आल्यामुळे गावातील राजकारण सांभाळताना नेत्यांना जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. असाच प्रकार साकोली, लाखनी, लाखांदूर व मोहाडी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीतही पदाधिकाऱ्यांना पहावयास मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)