शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत शैक्षणिक उपक्रमात १५ माध्यमिक शाळांचा सहभाग

By admin | Updated: July 8, 2016 00:34 IST

माध्यमिक शिक्षणातील गुणवत्ता वाढ व गळतीचे प्रमाण कमी करणे हा एक शिक्षणातील महत्वपूर्ण बाब आहे.

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार : विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यावर भरइंद्रपाल कटकवार भंडारामाध्यमिक शिक्षणातील गुणवत्ता वाढ व गळतीचे प्रमाण कमी करणे हा एक शिक्षणातील महत्वपूर्ण बाब आहे. यावर तोडगा काढण्याचा दृष्टीकोनातून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यात भंडारा जिलञह्यातील १५ माध्यमिक शाळ)ंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात याविषयी प्रधान सचिवांनी स्पष्ट निर्देश दिले होते. माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या बाबीवर स्वरूप निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) प्राचार्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यात माध्यमिक शिक्षणातील ‘केआरए’ अद्ययावत व त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्याचे निेर्देश दिले होते. त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांचा सहभाग यात करून घ्यायचा आहे. निवड करण्यात आलेल्या माध्यमिक शाळेत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात इयत्ता ९ वी व दहावीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, गणित, इंग्रजी विषयाच्या प्रगती चाचणी घेणे, विद्यार्थ्यांची क्षमता संपादणुकीसाठी कृती कार्यक्रम आखणे, नेतृत्त्व विकास प्रशिक्षण व पर्यवेक्षणीय यंत्रणेला प्रशिक्षण देणे, परिक्षेबाबतची भिती दूर करणे, पाठ्यक्रमावर आधारीत प्रश्नांना उत्तर देण्याची क्षमता निर्माण करणे, आदी बाबींचा समावेश आहे. यात विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग या उपक्रमाचा खऱ्या अर्थाने आधार मानला जात आहे. काय आहे उद्दिष्टराज्यातील प्रत्येक जिल्ह्याने १० ते १५ माध्यमिक शाळांची निवड करावी. शाळांना भेट द्यावी. शाळा बाह्य मुले विरहीत तालुका घोषित करण्यासाठी प्रयत्न करावे, चार विद्यार्थ्यांमागे एक ‘टॅबलेट’ असावे, गणित अध्यापनाच्या चांगल्या पद्धती शोधाव्यात, असे लक्ष्य जिल्हा शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. या माध्यमिक शाळांचा सहभागया उपक्रमांतर्गत सुबोध विद्यालय मासळ (ता.लाखांदूर), विद्या विहार मंदिर लाखांदूर, राधेय विद्यालय पिंपळगाव (ता. लाखांदूर), जिल्हा परिषद हायस्कूल आसगाव (ता.पवनी), नुतन कन्या शाळा भंडारा, जेसीस कॉन्व्हेंट भंडारा, जकातदार विद्यालय भंडारा, लाल बहादुर शास्त्री विद्यालय भंडारा, महिला समाज हायस्कूल भंडारा, जिजामाता हायस्कूल भंडारा, जिल्हा परिषद हायस्कूल वरठी (ता.मोहाडी), जिल्हा परिषद हायस्कूल साकोली, शारदा विद्यालय तुमसर, जनता विद्यालय तुमसर आणि सेंट जॉन मिशन स्कूल तुमसर या शाळांचा समावेश आहे