शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या कामावर परप्रांतीय मजूर

By admin | Updated: May 15, 2016 00:29 IST

तुमसर व मोहाडी तालुक्यातील चार वनपरिक्षेत्रांतर्गत विविध कामावर मध्य प्रदेशातील मजूर कामावर असल्याची धक्कादायक माहिती आहे.

वनविभाग म्हणते, जॉब कार्डधारकांनाच काम : मध्य प्रदेशातील मजुरांचा समावेशतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील चार वनपरिक्षेत्रांतर्गत विविध कामावर मध्य प्रदेशातील मजूर कामावर असल्याची धक्कादायक माहिती आहे. रोजगार हमी योजनेवर सदर मजूर कामे करीत आहेत. महाराष्ट्रात मध्य प्रदेशाचे मजूर कामावर ठेवण्याचे कारण काय असा प्रश्न येथे उपस्थित होतो.तुमसर व मोहाडी तालुकयातील कांद्री, नाकाडोंगरी, लेंडेझरी व तुमसर असे चार वनपरिक्षेत्र आहेत. या चारही वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे शुरु आहेत. यात वृक्ष लागवड, वन तलाव, पाणी साठवणूक, तलावांचे काम, वृक्ष लागवडीकरिता खड्डे तयार करण्यात येत आहेत. राज्यातील मजूरांनाच येथे काम मिळावा याकरिता प्रत्येक राज्य तसे नियोजन करते. तुमसर तालुक्यातील वन परिक्षेत्रात स्थानिक मजुरांना डावलून मध्य प्रदेशातील मजुरांना कामावर ठेवण्यात आले आहे. स्थानिक मजूर नियमांवर बोट ठेवतात त्यामुळेच परप्रांतीय मजुरांना रोजगार हमीच्या कामावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.वन विभागात उन्हाळ्यात मोठया प्रमाणात अनेक कामे केली जातात. निधीही मोठ्या प्रमाणात प्राप्त होतो. कामे दाखविणे गरजेचे आहे. त्याकरिता येथील अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लावून महाराष्ट्राच्या सीमेजवळील गावातील मध्य प्रदेश राज्यातील मजुरांना वन विभागाने कामावर ठेवले आहे. एका राज्यातील मजूर दुसऱ्या राज्याच्या शासकीय कामावर नियमानुसार ठेवता येत नाही, असा नियम आहे. स्थानिक मजूरांच्या हाताला काम मिळावे याकरिता प्रत्येक राज्य नियोजन करते. परप्रांतीय मजूरांना कामावर ठेवण्याची येथे रितसर परवानगी घेतली का, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणाची चौकशीची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)वनविभागात कार्यरत मजुरांचा जॉब कार्ड स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत तयार केला जातो. संबंधित मजुरांची मजुरी बँकेत खात्यावर जमा होते. नियमानुसार जॉब कार्डधारकांनाच वनविभागातील विविध योजनेच्या कामावर ठेवण्यात येते. त्यामुळे स्थानिकांनाच रोजगार प्राप्त होतो.अरविंद जोशी, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर.