शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाचे केंद्र ठरली पालोरा शाळा

By admin | Updated: August 12, 2014 23:36 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेकडे उपरोधिकपणे बघितले जाते. मात्र मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय त्याला अपवाद ठरले आहे. उत्कृष्ट व गुणवंत विद्यार्थी तयार करण्याची

शाळेचे परिसर हिरवेगार : शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनयुवराज गोमासे - करडीजिल्हा परिषदेच्या शाळेकडे उपरोधिकपणे बघितले जाते. मात्र मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय त्याला अपवाद ठरले आहे. उत्कृष्ट व गुणवंत विद्यार्थी तयार करण्याची परंपरा आजही सुरू आहे. सुसज्ज इमारत, भौतिक सुविधा, शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन येथील शाळेत विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विविध स्पर्धामध्ये शाळेचे नाव चमकले आहे. शाळेसमोरील बगीचा येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव मोहाडी तालुक्यातील नामवंत, गुणवंत शाळा म्हणून पुढे आले आहे. शाळेची सुसज्ज इमारत, प्रशाधनगृह, वर्गखोल्या, प्रशस्त क्रिडांगण, विविध खेळांचे साहित्य व प्रशिक्षण, आवारभिंत व सभोवताल फुल झाडांची, शोभीवंत झाडांची लागवड, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, ग्रंथालय व वाचन कक्ष, अभ्यासिका वर्ग, स्कॉलरशिप वर्ग, विविध स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन, स्वतंत्र प्रयोगशाळा व प्रायोजिक शिक्षण, सुंदर बगीचा, अध्यापकांचे निष्ठापूर्ण प्रामाणिक प्रयत्न व प्रोत्साहन भोजन कक्ष व कुचकर पोषण आहार, कर्मचाऱ्यांचे, पालक व गावकऱ्यांचे सहकार्य या भरवश्यावर शाळेने गुणवंत विद्यार्थी घडवित लौकीक मिळविला आहे.शाळा समिती अध्यक्ष बाबू ठवकर यांची शाळेप्रती समर्पणाची भावना कामे खेचून आणण्याची शैली त्याचबरोबर प्राचार्या एस.बी. कुरैशी यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन व समन्वय या बळावर शाळेने प्रगती साधल्याची कुबुली शाळा प्रशासनाने दिली आहे. प्रामाणिकता व गुणवत्ता यासाठी परिसरात शाळेचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. परिसरात अनेक शाळा स्पर्धेत असताना शाळेने साधलेली प्रगती खुणावण्यासारखी आहे.शाळेत ग्रंथालय प्रमुखाची जबाबदारी शिक्षक के.पी. माने सांभाळतात. ग्रंथालयात वाचनासाठी १००१ पुस्तके आहेत. दरवर्षी शाळेत पुस्तकांची खरेदी करण्याबरोबर देणगीदारांकडूनही पुस्तके स्विकारली जातात. झाडांची लागवत करून आतापर्यंत ५० झाडे जगविली गेली. शाळेत १० शिक्षक, ४ शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ५ ते १२ मध्ये एकूण ३०४ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.