शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक जगताहेत अधांतरी

By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST

संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़

धान खरेदी केंद्राचा अभाव : भाव मिळण्यासाठी शासन दरबारी नेतृत्वाची गरजसाकोली: संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़ बळीराजाने उत्पादन केलेल्या धानाला पुरेसाभाव मिळण्यासाठी सरकारशी भांडणाऱ्या लोकनेत्यांचा अभाव दिसत असल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ धान उत्पादकांचा खंबीर वालीच नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला दिसत आहे़ धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून, धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी शासन दरबारी भांडणाऱ्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे़ भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांकडून सहानुभूमी मिळवून राजकीय यशोशिखर गाठणारे महाभाग बरेच आहेत़ राज्यातील कापूस, ऊस व इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सवलती मिळवून देण्यासाठी तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून शासन दरबारी एकत्र भांडणारे लोकप्रतिनिधी राज्यातील काही भागात असल्याने आज कापसाला व इतर पिकाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे़ तो प्रकार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसून येत नाही़ गावातील सभामंचावरून शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखविणाऱ्या दमदार लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी धान उत्पादकांच्या व्यथा मांडून त्या दुर सारण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे़ धान उत्पादकांना शेतामधून धानाचे पिक घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ त्यातल्या त्यात खताच्या वाढलेल्या किमती तसेच किटकनाशक,वाढलेली मजुरी, बियाणांचे वाढीव भाव, आणि त्यामानाने उत्पादीत मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे़ अल्प प्रमाणात सबसीडीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार अनेकदा केला जातो़ तसेच निसर्गाच्या अवकृपेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे़ (तालुका प्रतिनिधी)