शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:13 IST

सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे रब्बी पिकांचा पेराही कमी होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.मागील पावसाळ्यात आॅगस्टनंतर पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शक्य तिथून पाणी मिळवून पिकाचे सिंचन करावे लागते. साकोली तालुक्यातील निम्न चुलबंद व भीमलकसा प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर किंवा शेतातील विहीर व बोरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.त्यामुळे यावर्षीही उत्पादन घटले आहे. संध्या हलक्या धानाची कापणी व चुरणे झाले आहे. शेतकरी हमीभाव धान खरेदी केंद्रात धानाची विक्री करीत होते. तालुक्यात जवळपास ३५ ते ४० हजार क्वींटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी काही शेतकºयांना धानाचे चुकारे मिळाले असून बरेच शेतकºयांना चुकारे मिळालेच नाही.भारी धानाच्या कापणीला आता सुरवात झाली आहे. मात्र शेवटी शेवटी पावसाच्या कमतरतेमुळे भारी धानाच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील तीन वर्षापासून सतत दुष्काळीसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्याकडे जमापंूजी शिल्लक नाही. अशावेळी दिवाळीला मुलांना कपडे खरेदी करण्यास शेतकरी असमर्थ ठरला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खाजगी उसनवार केल्याचे बरीच उदाहरणे समोर आली आहेत.वाढता कर्जबाजारीपणामागील तीन वर्षापासून बदलते पर्जन्यमान, किड रोगाचा प्रादूर्भाव यामुळे उत्पादन घटले आहे. मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी बीबीयाने, खते, रोवणी, तांदळाचा दर वाढण्याऐवजी कमी होत आहे. त्यामुळे बाजारात तांदळाची आवक मंदावली आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी यामुळे शेतकऱ्यावर दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढतच आहे.विम्याचा उपयोग कायशेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण देण्यासाठी कर्जाच्या रकमेतून विमा हप्त्याची कपात केली जाते. परंतु नैसर्गी आपत्ती, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकºयांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विम्याचा शेतकºयांना उपयोग काय असा प्रश्न आहे.