शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक धडकले जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:54 IST

'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे४८ दिवसानंतरही चुकारे नाही : अधिकाऱ्यांनी केले हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : 'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.पालांदूर परिसरात पावसाने सुरूवात केली असल्याने सर्वत्र शेतपरिसरात रोवणीला प्रारंभ झाला आहे. मात्र खिशात पैसे नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे विलंबाने का होईना खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना थकीत चुकारे मिळतील, अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना देखील पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंगच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक देवून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.१५ मे पासून जेवनाळा येथे हमी केंद्रावर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. संपूर्ण जून महिना उलटला तरी देखील शेतकºयांच्या हातावर रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पावलोपावली समस्या भेडसावत आहेत. बी-बियाणे, खते व शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असताना देखील शासनाकडून धानांच्या चुकाऱ्यांसाठी दुर्लक्ष होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील लोकप्रतिनिधींना भेटून आपले गाऱ्हाणे मांडले आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून परिचित असताना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे शासनाचे डोळेझाक होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत धान चुकाऱ्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.