शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

निकालाची उत्सुकता; जत्थे दूरदर्शन संचासमोर

By admin | Updated: May 16, 2014 23:50 IST

दूरदर्शन संचासमोर बसून नागरीक लोकसभा निवडणुकीतील निकाल जाणून घेत होते. निवडणूक कोण बाजी मारणार? ही उत्सुकता नवमतदारांपासून आबालवृद्धापर्यंंत सर्वांंमध्ये होती.

चंदन मोटघरे- भंडारा

दूरदर्शन संचासमोर बसून नागरीक लोकसभा निवडणुकीतील निकाल जाणून घेत होते. निवडणूक कोण बाजी मारणार? ही उत्सुकता नवमतदारांपासून आबालवृद्धापर्यंंत सर्वांंमध्ये होती. देशातील निवडणुकीचे एकंदरीत चित्र टिव्हीतूनच जनतेला कळले. भंडार्‍यात मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताच कोण कितीने समोर आहेत, हे विचारणार्‍यांची संख्याही बरीच होती. सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला, तेव्हापासून प्रत्येकांच्या घरचे दूरदर्शन संच सुरू झालेले होते.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पार पडली. मतमोजणी ज्या ठिकाणी झाली. त्या परिसरात जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आल्यामुळे प्रवेशपत्रधारकांशिवाय लोकांची गर्दी नव्हती. प्रवेश मिळत नसल्याचे पाहून लोकांनी टी.व्ही. च्या माध्यमातून निकाल जाणून घेतला.

प्रत्येक चौकातील पानटपरीसमोर, दुकानासमोर दूरदर्शन संच लावलेले होते. भंडारा मतदारसंघाच्या निकालासोबतच हिंदी व मराठी वाहिन्यांमधून निकालाची माहिती जाणून घेताना दिसले. घरातील दूरदर्शन संचासमोर बसून कुटूंबासोबत निकालांची माहिती घेणारेही कुटूंबही अनेक होते. प्रत्येकांच्या तोंडी परिवर्तन हेच नाव होते. एनडीए सरकारने मारलेली बाजी हाच विषय प्रत्येकाच्या मुखात होता.

भंडारा-गोंदिया क्षेत्रात भाजपाचे नाना पटोले व राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांच्यात थेट लढत होणार, अशी चिन्हे होती. प्रत्येक फेरीनंतर भाजपाचे नाना पटोले पुढे असल्याच्या वार्ता बाहेर येत होत्या. एनडीए, युपीएने किती जागा मिळविल्या ही आकडेवारी टी.व्ही. वर झळकत होती.

या निवडणुकीत ‘मोदी’ लहरीचा प्रभाव दिसून आला. त्याचाच परिणाम भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकात दिसून आला. मतमोजणी केंद्रावरून सकाळी ८.३0 वाजता शुकशुकाट होता. पोलीस विभागाने कारधा नाक्यापासून रस्ता प्रतिबंधित केला होता. अवजड वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरून बंदी केली होती. पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.