शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, १४९ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST

भंडारा : गत आठ दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचा ...

भंडारा : गत आठ दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊन तब्बल १४९ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ८१ रुग्णांचा समावेश आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०१ असून सुदैवाने बुधवारी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या सर्वांच्या चिंतेचा विषय झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नवीन वर्षात अगदी नगण्य होती. दोन आकडी रुग्णसंख्या तीही ५० च्या आत राहत होती. परंतु गत १० दिवसापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. तपासणीच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक येत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी १५७१ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात १४९ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा तालुक्यात ८१, मोहाडी १२, तुमसर २२, पवनी २६, लाखनी १, साकोली ७ रुग्ण आढळून आले. लाखांदूर तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नाही. बुधवारी ३८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या ७०१ रुग्ण उपचाराखाली आहेत. कुणाच्याही मृत्यूची नोंद नसली तरी मृतांचा आकडा ३२९ झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७२८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले. त्यात १४ हजार ६२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ६२४७, मोहाडी ११२३, तुमसर १८८६, पवनी १३८८, लाखनी १५६३, साकोली १७५७, लाखांदूर ६६७ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १३ हजार ६०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ७०१ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा तालुक्यात ३८६, मोहाडी ३९, तुमसर १०१, पवनी ८५, लाखनी ४३, साकोली ३७ आणि लाखांदूर तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ३७ हजार व्यक्तींना कोरोना लस

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आतापर्यंत ३७ हजार ५४ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. त्यात हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ४५ ते ६० आणि ६० वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर, मोहाडी, लाखनी येथील जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. जानेवारी महिन्यात ३,४५४ हेल्थकेअर वर्करला लस देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात १० हजार ६७३ व्यक्तींना लस देण्यात आली तर, या महिन्यात १६ मार्चपर्यंत २२ हजार ९४७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.